आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इराकची सद्यस्थिती- दहशतवाद्यांशी लढण्यासाठी नागरिकच घेताहेत सैन्य प्रशिक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इराक संरक्षण दलात भरती होणार्‍या नागरिकांना कर्बलामध्ये प्रशिक्षण देताना एक जवान)
तिकरितः एकीकडे तेल शुध्दीकरण प्रकल्पावर झालेल्या सुन्नी हल्ल्यानंतर इराकी सैन्याकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत दुसरीकडे दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी देशातील नागरिकांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येने नागरिक सैन्यात भरतीही झाले आहेत. सैन्यात स्वयंसेवकांची भरती केली जात असून त्यांना सैन्य प्रशिक्षण देण्यात येत आहे.

दहशतवाद्यांनी केला मोर्टार आणि बंदूकांनी केला तेल शुध्दीकरण प्रकल्पावर हल्ला
इराकची राजधानी बगदादपासून 200 अंतरावर असलेल्या बैजी येथील तेल शुध्दीकरण प्रकल्पावर काल सुन्नी संघटना इसिसच्या (आयएसआयएस) दहशतवाद्यांनी बंदूका आणि मोर्टारच्या साह्याने हल्ला केला. अल-अरबियाने प्रसारित केलेल्या व्हिडीओमध्ये येथील तेलशुध्दीकरण प्रकल्पातून धूर निघताना दिसत होता. या शुध्दीकरण प्रकल्पात इसिस वापरत असलेला काळा झेंडाही दिसला.
सर्व कर्मचार्‍यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले
या तेलशुध्दीकरण प्रकल्पात अडकलेल्या 250-300 कर्मचार्‍यांना गुरूवारी सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या दहशतवादी हल्ल्यादरम्यान प्रकल्पात अडकलेल्या एका कर्मचार्‍याने फोनवरून मिलिटरी हेलिकॉप्टर आणि दहशतवाद्यांमध्ये युध्द सुरू असल्याची माहिती दिली होती.

इराक गृहयुध्दाची सद्य स्थिती जाणून घेण्यासाठी पाहा पुढील स्लाईड...