आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इराकमधील ऐतिहासिक स्मारके धोक्यात, युद्ध झाल्यास पिढीजात ठेव्याचे नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कर्बला शहराचे छायाचित्र)
आंतरराष्ट्रीय डेस्क - इराकचे ऐतिहासिक महत्त्व फार मोठे आहे. मेसोपोटामियाच्या संस्कृतीपासून ते इतर अनेक संस्कृतींची सुरूवात ही इराकमधूनच झाल्याचे सांगण्यात येते. मात्र मागील काही वर्षांमध्ये इराकच्या अत्यंत जून्या आणि ऐतिहासिक स्मारकांना मोठे नुकसान पोहोचले आहे. इराकवर 2003 मध्ये झालेल्या अमेरिकेच्या हल्ल्यानंतर जवळपास आठ वर्ष सुरू असलेल्या संघर्षामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान झाले. आता इराक पुन्हा एकदा युध्दाच्या तोंडावर उभा आहे, अशात पुन्हा एकदा येथील ऐतिहासिक स्मारकांच्या अस्तित्वाचा प्रश्न नि्र्माण झाला आहे.

पुढे वाचा... इराकच्या काही अशा ऐतिहासिक वास्तूंबद्दल, ज्यांच्यावर आता पुन्हा नष्ट होण्याची भिती आहे...
करबला
इराकची राजधानी असलेल्या बगदाद शहरापासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या करबला शहराला अल-करबला आणि करबला अल-मुक्द्दशाह या नावानेही ओळखले जाते.
हे ठिकाण शिया मुस्लीमांचे तिर्थस्थळ मानले जाते. करबलाच्या युध्दानंतर या शहराला इस्लामची शिया शाखा म्हणून ओळख मिळाली. करबलामध्ये 23 पेक्षा जास्त धार्मिक शाळा आणि 100 मशिदी आहेत. यामधील अब्बाद मशिद, मशाद अल-हुसेन आणइ पैगंबर साहेबांचे पणतू हुसाईन इब्न यांचा मकबरा सर्वात जास्त प्रसिध्द आहेत. वेळोवेळी येथे हल्ले होत आले आहेत. मात्र हे युध्द वाढण्याच्या शक्यतेमुळे या स्मारकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.
पुढील स्लाईडवर पहा... इतर ऐतिहासिक स्मारकांबद्दल...