आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Iraq Historical Heritage Also In Crisis, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इराकच्या या वास्तू आहेत संकटात, दहशतवाद्यांनी कारवाया तीव्र केल्यास होऊ शकतात नष्‍ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( करबलामधील छायाचित्रे ) - Divya Marathi
( करबलामधील छायाचित्रे )
इंटरनॅशनल डेस्क- इराकमधील मेसोपोटेमिया संस्कृती जगप्रसिध्‍द आहे. परंतु ती आता धोक्यात आली आहे. कारण मेसोपोटेमिया संस्कृतीच्या उदयापासून बांधण्‍यात आलेल्या वास्तू नष्‍ट होण्‍याच्या मार्गावर आहेत. अमेरिकेने 2003 मध्‍ये इराकवर केलेल्या हल्ल्यानंतर जवळ-जवळ आठ वर्षे चाललेल्या संघर्षात अनेक वास्तूंची पडझड झाली. पुन्हा एकदा इराकमध्‍ये युध्‍दजन्य स्थिती निर्माण झाली आहे. आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने ती तयार केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ऐतिहासिक वास्तूंना धोका निर्माण झाला आहे.
पुढे आम्ही इराकमधील ऐतिहास‍िक वास्तूंविषयी माहिती देणार आहोत जी आता धोक्याच्या छायेत आहेत.....
करबला
राजधानी बगदादपासून 100 किमी अंतरावर असलेल्या करबला प्रांताला अल-करबला किंवा करबला अल-मुकद्दशाह नावानेही ओळखले जाते. ते शिया मुसलमानांचे पवित्र तीर्थस्थान आहे. त्यास करबलाच्या युध्‍दानंतर इस्लामची शिया शाखा म्हणून मान्यता मिळाली. येथे 23 पेक्षा जादा धर्मशाळा आणि 110 मशिदी आहेत. यापैकी अब्बाद, मशाद अल-हुसैन आणि पैगंबर मोहम्मद यांचा नातू हुसाइन इब्न यांचे मकबरे प्रसिध्‍द आहेत. वारंवार होणा-या युध्‍दामुळे संबंधित वास्तू धोक्यात आली आहेत.
पुढील स्लाइड्समध्‍ये जाणून घ्‍या इतर ऐतिहास‍िक वास्तूंविषयी....