आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Iraq Shia Cleric Says Sunni Militants Must Be Ousted

इराक संकट : शिया मशिदी, सुफी दर्ग्यांवर बुलडोझर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - इराक च्या शिया व सुन्नी अरब बहुल भागातील निनेवेह प्रांतामध्ये इस्लामिक स्टेटचे दहशतवादी धुमाकूळ घालत असून त्यांनी या भागातील अनेक ऐतिहासिक सुन्नी अरब,सुफी दर्गे,शियांच्या मशिदी बुलडोझर घालून व सुरुंग लावून उदधवस्त केले आहेत. या ठिकाणी आयसिसचे हे कृत्य म्हणजे अफगणिस्तानातील तालिबानी राजवटीची आठवण करुन देणारे ठरले आहे.तसेच चर्चवर कब्जा करीत त्यावरील क्रुस काढून त्या ठिकाणी इस्लामचे काळे झेंडे फडकावण्यात आले.

निनेवेह प्रांतात किमान चार सुन्नी अरब व सुफी दर्ग्यांवर दहशतवाद्यांनी सरळ बुलडोझर चढवले तर सहा हुसेनियाहस अर्थात शियांच्या मशिदी उद्धवस्त करण्यात आल्या.या प्रांताची राजधानी मोसुल आहे. इस्लामिक स्टेटच्या वेबसाईटवर जिहादींनी त्याची छायाचित्रे टाकली आहेत.सुन्नी व सुफी दर्ग्यांवर बुलडोझर व शियांच्या मशिदी स्फोटके लावून उडवण्यात आल्याचे छायाचित्रांमध्ये दिसून येते. 90च्या दशकात अफगणिस्तानातील तालिबानी दहशतवाद्यांनी बामियान येथील ऐतिहासिक बुध्दमूर्ती तोफांनी उध्दवस्त केल्या होत्या.