आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइराक युद्धाला १० वर्ष पूर्ण होत आहेत. याप्रसंगी जगभरातील माध्यमांमध्ये युद्ध गरजेचे होते का, यावरून चर्चा सुरू आहे. जैविक अस्त्रांचा बागूलबुवा दाखवून अमेरिकेने सुरू केलेल्या युद्धात कोणाचा फायदा आणि कोणाचे नुकसान झाले यावर वादविवाद सुरू आहे. अमेरिकने युद्धाला तोंड फोडून जय मिळवला असला किंवा त्यांनी सद्दाम हुसैनला मृत्यूदंडाची शिक्षा दिली असली तरी, अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष बराक ओबामा युद्ध हाच एकमेव मार्ग नाही, असे मानणा-यांपैकी एक आहेत. इराकमधील स्थिरता आणि शांतता त्यांना हवी असली तरी त्यांना युद्धाचा निर्णय योग्य वाटत नाही.
युद्धाच्या आठ वर्षानंतर (२०११) अमेरिकेने इराक मधील आपले बस्तान हलवले होते. इराक युद्धात अमेरिकेच्या ४,४७५ सैनिकांना जीव गमवावा लागला, तर ३२ हजार सैनिक जखमी झाले होते.
या युद्धात अमेरिकेने पहिली गोळी झाडली असेल तर त्याचा शेवट एका इराकी व्यक्तीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बुश यांच्यावर बुट फेकून केला होता. divyamarathi.com इराक युद्धादरम्यानची काही खास छायाचित्रे आपल्या वाचकांसाठी घेऊन येत आहे. त्याचा हा दूसरा भाग.
नोट : पुढील स्लाईडमधील काही छायाचित्रे वाचकांना विचलीत करू शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.