आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्धाची दहा वर्षे : छायाचित्रातून पाहा अमेरिकेने कसा बेचिराख केला इराक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इराक यु्द्धाला दहा वर्ष पूर्ण होत आहेत. जैविक अस्त्रांचा शोध घेण्यासाठी अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी या युद्धाला तोंड फोडले होते. दहा वर्षानंतर अमेरिकेतील अनेक नागरिकांना प्रश्न पडला आहे की, या युद्धातून काय मिळाले. सद्दाम हुसैनला फासावर लटकवण्याशिवाय या युद्धातून काहीही निष्पन्न झालेले नाही. गॅलप या अंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ५३ टक्के नागरिकांनी इराकवर लादलेले युद्ध ही अमेरिकेची सर्वात मोठी चूक होती असे म्हटले आहे. अमेरिका आणि त्यांच्या सहकारी राष्ट्रांनी केवळ अफवांवर इराकला युद्धाच्या खाईत लोटले. जागतिक विरोध आणि संयुक्त राष्ट्राच्या नकारानंतरही अमेरिकेने इराकमध्ये दोन लाख सैनिक पाठवले आणि हवाई हल्ले केले. काही दिवस अमेरिकेला त्रस्त केल्यानंतर इराकची राजधानी बगदादने आत्मसमर्पण केले.