आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Iraqi Crisis: Children Drinking Parents’ Blood To Stay Alive

इराक : तहानेने व्याकूळ मुलांना जिवंत ठेवण्यासाठी स्वतःचे रक्त पाजत आहेत यझिदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - इराकमध्ये दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या दहशतीने सिंजरच्या डोंगरात लपून बसलेल्या यझिदींनी तहान-भुकेने व्याकूळ आपल्या कच्चा-बच्चांना स्वतःचे रक्त पाजून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला होता. येथील 8000 लोकांच्या दारुण अवस्थेची माहिती ते डोंगर रांगातून सुरक्षीत बाहेर पडल्यानंतर झाली.
सिंजरच्या डोंगरावर लपून बसलेल्या आणि सुरक्षीत राहिलेल्या एकाने स्काय न्यूजला सांगितले, की त्याने स्वतःच्या हाताने अन्न - पाण्यावाचून तडफडत जीव सोडलेल्या आपल्या चार मुलांना काळजावर दगड ठेवून दफन केले. डोंगरावर त्यांना दफनविधीसाठी जागा देखील नव्हती. त्यामुळे त्याने स्वतःच्या मुलांच्या मृतदेहावर अक्षरशः दगडरचले आणि त्यांना त्याखाली दफन केले. एकाने सांगितले, की अन्न-पाणी नसल्याने मुलांची अवस्था केवलवाणी झाली होती. ते पाहून एका पालकाने स्वतःचा हात कापून आपले रक्त मुलांना पाजले.