आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Irish Hospital's Doctors Failed To Treat Savita Halappanavar, Leaked Death Probe Report Says

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सविताच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार, आयर्लंडमधील तपास अहवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- आयर्लंडमधील भारतीय डेंटिस्ट सविता हलप्पनवार यांचा मृत्यू डॉक्टरांच्या असंख्य चुकांमुळे झाल्याचे उजेडात आले आहे. मृत्यू प्रकरणाचा तपास अहवाल शनिवारी फुटल्यामुळे हे सत्य बाहेर आले.


सविताचे प्राण वाचवता आले असते. अहवाल आयरिश आरोग्य मंत्रालयाने तयार केला आहे. डॉक्टरांना शस्त्रक्रियेदरम्यान अपयश आले आहे, असा ठपका अहवालातून ठेवण्यात आला आहे. ब्रिटनमधील ‘द इंडिपेंडंट ’ने हा वादग्रस्त अहवाल प्रकाशित केला आहे. सविताला गेल्या वर्षी 21 ऑक्टोबर रोजी पाठिच्या दुखण्यामुळे गॅलवे विद्यापीठाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा 28 ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. सविता 17 आठवड्यांची गरोदर असताना त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. त्यांचा गर्भपात करणे आवश्यक होते. परंतु आयर्लंड कॅथोलिक देश आहे. त्यामुळे गर्भपाताला देशात परवानगी नाही, तसा नियम आहे. डॉक्टरांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे सविताच्या शरीरात संसर्ग झाला. दुर्लक्षामुळे गर्भ आणि त्यांना सेप्टिसीमिया होऊन त्यांचा मृत्यू झाला.