आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Is Bobby Jindal Preparing For A 2016 Presidential Run ?

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे बॉबी जिंदाल यांना वेध! \'2016\'ची तयारी सुरु

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेतील लुझियाना राज्याचे गर्वनर व रिपब्लिकन पक्षातील उद्योन्मुख नेतृत्त्व बॉबी जिंदाल 2016 साली होणा-या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. मूळ भारतीय वंशाचे असलेल्या जिंदाल यांनी त्यासाठी आतापासून तयारी सुरु केली असून, अमेरिकेच्या नागरिकांत 2016 साठी आपली प्रतिमा निर्माण करण्याच्या दिशेने काम सुरु केल्याचे तेथील माध्यमांत आलेल्या वृत्तात म्हटले आहे.

41 वर्षीय जिंदाल यांची लुझियाना राज्याच्या गर्वनरपदी 2011 मध्ये दुस-यांदा निवड झाली होती. त्यांनी आपल्या राज्यात 'स्विपिंग स्कूल व्हायचर प्लॅन' मंजूर केले. तसेच ओबामांचे मेडिक्लेम एक्सपेंशन (ओबामाकेअर) आणि राज्यातील नागरिकांचा प्राप्तीकर घेण्याचे विधेयक फेटाळून लावले आहे. जिंदाल यांचा गर्वनर म्हणून आता दोन-अडीच वर्षाचा कार्यकाळ राहिला आहे. त्यानंतर ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्य़तीत उतरतील असे तेथील राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने त्यांची तयारी दिसून येत आहे. अमेरिकन नागरिकांच्या मनात बॉबी जिंदाल यांची उच्च दर्जाची प्रतिमेचे दर्शन व्हावे, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे तेथे चर्चा आहे.

जिंदाल 2016 ची निवडणूक लढवतील का याची शक्यता कोणीही फेटाळून लावत नाही. ते एक वास्तव आणि सत्य बाब आहे. जसे सुर्य पूर्वेला उगवतो, असे मत प्रा. बॉब मान यांनी व्यक्त केले आहे. बॉब मान हे डेमोक्रेटिक पक्षाचे गर्वनर कॅथलिन ब्लॅन्को व माजी सिनेट सदस्य जॉन ब्युरेक्स यांचे सल्लागार होते. बॉब सध्या लुझियाना राज्य विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम पाहत आहेत.