आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियावरील हल्ल्यास भारताचा पाठिंबा?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन /नवी दिल्ली - ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी सिरियावरील हल्ल्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मंगळवारी भारतातर्फे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.


भारतातील लंडनमधील दूतावासाने ब्रिटिश सरकारजवळ नाराजी व्यक्त केली. त्यानंतर ब्रिटनने वक्तव्यावर खेद व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. ब्रिटिश संसदेच्या गेल्या आठवड्यातील अधिवेशनात पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी सिरियावरील हल्ल्यात आपला देश अमेरिकेसोबत असल्याचे म्हटले होते. गुरुवारी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि तुर्कस्तानसोबत भारताचेही नाव जोडण्यात आले होते. भारताच्या नावाचा समावेश कारकुनाची चूक होती, असे कॅमेरून यांनी म्हटल्याचे सांगण्यात येते. 10 डाउनिंग स्ट्रीटच्या (ब्रिटिश पंतप्रधानांचे निवासस्थान) म्हणण्यानुसार, वक्तव्य तपासले जात असल्याचे सांगण्यात येते.