आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसाबेल पहिली महिला आफ्रिकन अब्जाधीश

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुआंडा - अंगोलाच्या राष्ट्रपतींची मुलगी इसाबेल दोस सांतोस ही आफ्रिकेतील पहिली महिला अब्जाधीश बनली आहे. इसाबेल 40 वर्षींची आहे. आफ्रिकेपासून युरोपपर्यंत तिचा कारभार विस्तारलेला आहे. फोर्ब्ज नियतकालिकाच्या मते एका अंगोलियन बँकेने तिला अब्जाधीश घोषित केले. तिची संपत्ती एक अब्ज डॉलर म्हणजेच 53.68 अब्ज रूपयांपेक्षा अधिक आहे, सांतोस हे तेलसमृद्ध अंगोलाचे 1979 पासून राष्ट्रपती आहेत.

इसाबेलाचा जन्म एप्रिल 1973 मध्ये अझरबैजानमध्ये झाला. तिची आई तातियाना कुकानोवा अझरबैजानची आहे. इसाबेलने लंडनच्या किंग कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि बिझनेस मॅनेजमेंटची पदवी संपादन केली आहे.

लंडनमध्ये कांगोच्या एक मोठे व्यापारी व कला संग्राहक सिंदिका दोकोलोशी तिची भेट झाली. दोघांचे लग्नही शाही पद्धतीने झाले होते. बेल्जियमहून गायक मंडळी बोलावण्यात आली होती. दोन चार्टेड विमानांनी फ्रान्सहून भोजन मागवण्यात आले होते. इसाबेलच्या लग्नावर सुमारे 40 लाख डॉलर खर्च करण्यात आले होते.