Home | International | Pakistan | isi murderd pakistani reporter

आयएसआय ने केली पाकिस्तानी पत्रकाराची हत्या

Agency | Update - Jun 01, 2011, 10:17 AM IST

नुकत्याच पीएनएस मेहरान या लष्करी तळावर झालेल्या हल्यावर त्यांनी केलेल्या वार्ताकंनामुळे नाराज असलेल्या आयएसआयनेच हे कृत्य केले असे म्हटले जाते

 • isi murderd pakistani reporter

  इस्लामाबाद- पाकिस्तानी सैन्य आणि अल कायदा विरूध्द शोध पत्रकारिता करणारे 'एशिया टाइम्स' चे पाकिस्तान ब्युरो चीप सय्यद सलीम शहजाद यांची हत्या करण्यात आली असून आयएसआयनेच शहजाद यांची हत्या केल्याचा आरोप पाकिस्तानच्या मानवाधिकार संघटनेने केला आहे. हत्या करण्यापूर्वी त्यांना बेदम मारण्यात आली होती, त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा आढळून आल्या असे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. रविवार पासून ते बेपत्ता होते. आयएसआय आणि अतिरेक्यांविरूध्दच्या त्यांच्या शोध पत्रकारितेवर आयएसआय नाराज होती व त्यांना तशा वारंवार धमक्याही यायच्या.

  नुकत्याच पीएनएस मेहरान या लष्करी तळावर झालेल्या हल्यावर त्यांनी केलेल्या वार्ताकंनामुळे नाराज असलेल्या आयएसआयनेच हे कृत्य केले असे म्हटले जाते. नेव्ही मधील अधिकार्यांचे अल कायदा या अतिरेकी संघटनेशी संबंध आहेत असे त्यांनी त्यामध्ये म्हटले होते. त्यांच्या त्या बातमीवरून अनेक अधिकार्यांची चौकशी सुरू करण्यात आली होती.

  शहजाद यांना पाकिस्तानी गुप्तचर संघटनांकडून वांरवार जीवे मारण्याच्या धमक्या यायच्या. पाकिस्तानने गेल्या वर्षी तालिबानचा सदस्य मुल्ला बरादरला पकडून नंतर त्याची गूपचूप सुटका करण्यात आली होती, ही बातमी सर्वप्रथम शहजाद यांनीच दिली होती.

  'इनसाइड अल कायदा अन्ड तालिबान, बियांड बिन लादेन अन्ड ९/११' या पुस्तकाचे ते लेखक आहेत.

  कार्यालयात जाण्यासाठी रविवारी ते घरातून बाहेर पडले होते तेव्हा पासून गायब ते होते. पाकिस्तानातील पत्रकारांनीदेखील शहजाद यांची हत्या आयएसआयनेच केली असल्याचा दावा केला आहे, कारण गेल्या अनेक दिवसापासून त्यांना आयएसआय कडून धमक्या येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Trending