आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन करतोय पाकिस्तानमधून भारताची टेहळणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारताशी संबंधित गुप्तचर संघटनाकडून मिळालेल्या सूचना व माहिती गोळा करण्यासाठी चीन आणि पाकिस्तान यांच्यात समझोता (?) झाला आहे.
भारतीय गुप्तचर संघटनाच्या हाती असे काही सबळ पुरावे सापडले आहेत ज्यातून दिसते की, चीनच्या गृहमंत्रालयाने ( एमएसएस) पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयकडून भारतासह तिबेटमधील माहिती व घटनाक्रमाचा आढावा घेतला आहे. याबाबत सांगितले जात आहे की, आयएसआयचे भारतीय उपखंडात चांगले बस्तान असल्याने चीनने त्यांची मदत घेतली आहे.
सरकारी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर संघटनांची माहिती हेच सांगत आहे की आयएसआय व चीन यांच्यात एक समझोता करार झाला असून, ते भारताशी संबंधित सर्व माहिती गोळा करीत आहेत. दोन्ही देशांना भारताची काळजी वाटत आहे त्यामुळे गेल्या दोन वर्षात चीनचे गृहमंत्रालय व आयएसआय यांच्यात पाच वेळा वैठका झाल्या आहेत. ज्या बैठकांत दोन्हीकडील मुख्य अधिकारी उपस्थित राहिले आहेत. या बैठकीत भारताशी संबंधित मुद्यांवरच चर्चा झाल्याचे समजते. दलाई लामा यांनी भारतातील एका बुद्ध संमेलनात सहभाग घेण्यावरुन भारत-चीनचे संबंध ताणले गेले होते. त्यामुळे भारत सरकारच्या भूमिकेकडे त्यांनी लक्ष ठेवले आहे.
भारताला एक चिंता मोठी सतावत आहे ती म्हणजे भारतीय गुप्तचर संघटनेतील एक गट असे म्हणतो आहे की, पाकिस्तानची आयएसआय ही संघटना चीनला भारताविरुद्ध भडकावत आहे. याबाबत सांगितले जात आहे, तिबेटी आंदोलनाबाबत आयएसआय चीनला भारताची भूमिका वाढवून-चढवून सांगत आहे. ज्यामुळे भारत आणि चीन यांच्यात ताणतणाव वाढू शकतो. २००८ मध्ये तिबेटमध्ये झालेले दंगे याच्यानंतर चीन तिबेटच्या बाबतीत अधिक सतर्क झाला आहे. मागील आठवड्यात चीनचे पंतप्रधान वेन जियाबाओ यांना नेपाळने आश्वासन दिले आहे की, नेपाळच्या भूमीवरुन तिबेटी कारवाई होणार नाहीत.
सीमा प्रश्नांवरुन भारत-चीन आज आमने-सामने
जून-जुलैमध्ये चीन करणार भारतावर हल्ला?
पाक लष्करप्रमुख कियानी चीन दौ-यावर