आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Acts Against Islam, Says Malaysian PM Najib Razak, Divya Marathi

ISIS ची कृती ही इस्लामविरोधी, मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर - इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया( आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेने इराक आणि सीरियामध्‍ये चालवलेली हिंसा ही इस्लामचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणुकीविरूध्‍द आहे, असे मत मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी व्यक्त केले आहे. यामागे नुकतेच मलेशियाच्या तीन महिलांनी आयएसआयएस या दहशतवादी संघटनेत प्रवेश केल्याची पार्श्‍वभूमीवर आहे.
मलेशियाच्या तीन महिलांनी आयएसआयएसच्या दहशतवाद्यांना सुख देण्‍यासाठी संघटनेत प्रवेश केल्याचे वृत्त प्रसिध्‍द झाले आहे. यामुळे रझाक यांनी आपली भूमिक स्पष्‍ट केली आहे. ते पुढे म्हणाले, ही संघटना इस्लामिक कायद्याविरोधात कृत्य करत आहे. आम्ही आयएसआयएसचे निषेध करतोय.