आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS ने इस्लामिक राष्ट्र घोषित केल्यानंतर जारी केला पासपोर्ट, बगदादीही आला जगासमोर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - इराक आणि सीरियाच्या अनेक भागांवर कब्जा करुन त्याला इस्लामिक राष्ट्र घोषित करणारी दहशतावादी संघटना आयएसआयएसने (इस्लामिक स्टेट इन इराक अँड अल-शाम) त्यांचा स्वतंत्र पासपोर्ट जारी केला आहे. यावर ' स्टेट ऑफ द इस्लामिक खलीफा' असे लिहिलेले आहे. तर, दुसरीकडे आयएसआयएसचा प्रमुख अबु बकर अल-बगदादी प्रथमच जगासमोर आला आहे. संघटनेच्यावतीने इंटरनेटवर एक व्हिडिओ अपलोड करुन बगदादी जगभरातील मुस्लिमांना त्याच्या आदेशाचे पालन करण्याचे आणि युद्धात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहे. या व्हिडिओमधील व्यक्ती बगदादीच आहे, याला दुजोरा मिळालेला नाही. दुसरीकडे इराक सरकारने हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला आहे.
आयएसआयएसच्या ताब्यातील भूभागावर त्यांचा पासपोर्ट
सऊदी अरबची वेबसाइट अल अरबियाने दहशतवाद्यांनी त्यांचा पासपोर्ट जारी केल्याचे वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार, कथित पासपोर्टवर अरबी भाषेत काही लिहिलेले आहे. त्याचा इंग्रजी अनुवाद 'स्टेट ऑफ इस्लामिक खलीफा' असा होतो. पासरपोर्टच्या खालच्या बाजूला लिहिले आहे, की पासपोर्ट धारकाला काही झाले तर, आयएसआयएस त्याची मदत करेल आणि त्याच्या सेवेत आर्मी तैनात केली जाईल.
इराकपासून सीरियापर्यंत खलीफाचा भाग
अल अरबिया या वेबसाइटनुसार, आयएसआयएसने म्हटले आहे, की इराक आणि सीरियाला लागून असलेल्या सीमा भागातील 11,000 हजार नागरिकांना नवे दस्तावेज दिले जातील. या दहशतवादी संघटनेचे म्हणणे आहे, की उत्तर सीरियाच्या अलेप्पो पासून पूर्व इराकच्या दियाल पर्यंत खलीफाचे अधिकार क्षेत्र असणार आहे.
आयएसआयएसच्या कथित पासपोर्टची मोसुल येथील सरकारी सुविधा केंद्रात छापाई होत आहे. या केंद्राची स्थापना 2011 मध्ये करण्यात आली होती.
छायाचित्र - आयएसआयएसने जारी केलेल्या पासपोर्टचे छायाचित्र ट्विटरवरुन घेण्यात आले आहे.