दमिश्क - सिरीयाच्या अलेप्पो प्रातांतील अल-बाब येथे इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी चोरीचा आरोप असलेल्या एका व्यक्तीचे हात कापले. तर, एकाला सिरीयाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांचा गुप्तहेर असल्याचे सांगत खुलेआम फासावर लटकवण्यात आले. इस्लामिक स्टेटने शरियत कायद्यानुसार देण्यात आलेल्या क्रूर शिक्षेची छायाचित्रे देखील जारी केली आहे.
चोरीचा आरोप असलेल्या व्यक्तीला डोळेबांधून चौकात आणण्यात आले आणि त्याचे हात कलम केले गेले. याची छायाचित्रे ISIS ने जारी केली आहेत. भरचौकात हात कलम केल्याची ही छायाचित्रे प्रसिद्ध करण्याच्या एक आठवड्यापूर्वी इस्लामिक स्टेटने अलेप्पो येथे एका व्यक्तीला फासावर लटकवले. त्याच्यावर आरोप होता, की त्याने अलेप्पो येथील इस्लामिक स्टेटच्या इमारतीजवळ मायक्रोचिप डिव्हाइस लावले आहे.
त्याआधी
इराकमधील किरकूक येथे दारू प्याल्यामुळे तीन लोकांना भरचौकात चाबुकाचे फटके मारेल होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, इस्लामिक स्टेटने जारी केलेली छायाचित्रे