आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आयएस'ने केली अतिरेक्यांची हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - इस्लामिक स्टेटने (आयएस) सिरियात आपल्याच १०० विदेशी अतिरेक्यांची हत्या केली आहे. हे सर्व अतिरेकी आयएसशी संबंध तोडून आपापल्या घरी परतण्याची योजना आखत होते. सिरिया सोडून पलायनाच्या तयारीत असलेल्या १०० विदेशी अतिरेक्यांची आयएसने ओळख पटवली होती. यानंतर त्यांची थेट हत्या करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, ब्रिटनचे पाच, फ्रान्सचे तीन, जर्मनी व बेल्जियमचे प्रत्येकी दोन-दोन नागरिक सिरियात आयएसकडून लढण्यासाठी गेले होते. ते सिरियाचे राष्ट्रपती बशर अल असद यांच्या सरकारविरुद्ध लढण्यास इच्छुक होते. मात्र, त्यांना बंडखोरांविरुद्धच लढावे लागत होते. यामुळे आयएस सोडून पळ काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र बंदी बनवून त्यांची हत्या केली.