आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकाराचे शीर कापण्याचा VIDEO हृदय पिळवटून टाकणारा, ओबामांची प्रतिक्रिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : आयएसआयएसच्या ताब्यात असलेले अमेरिकेचे पत्रकार जेम्‍स फॉली, यांचेच शीर कापण्यापूर्वी त्यांनी एक संदेश दिला.

बगदाद/वॉशिंग्टन - अमेरिकेचे पत्रकार जेम्स फॉली याचे शीर धडावेगळे करण्याच्या आयएसआयएस (ISIS) ने अपलोड केलेल्या व्हिडीओला अमेरिकेने दुजोरा दिला आहे. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी हा व्हिडीओ जीवाचा थरकाप उडवून देणारा असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी आयएसआयएसच्या विरोधात कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. ब्रिटन फ्रान्ससह जगातील अनेक देशांनी या घटनेचा निषेध केला आहे.

जगाने एकजूट होण्याचे ओबामांचे आवाहन
बराक ओबामा म्हणाले की, पत्रकार जेम्स फॉली यांच्या क्रूर हत्येच्या घटनेने संपूर्ण जग हादरले आहे. संपूर्ण जगात कोणीही या प्रकाराचे समर्थन करू शकत नाही. या कँसरचा सामना करण्यासाठी जगातील सर्व देशांनी एकजूट व्हावे, असा संदेश ओबामांनी दिला आहे. जगात अशा अमानवीय विचारांना काहीही जागा नसल्याचेही ते म्हणाले.
आयएसआयएसचा व्हिडीओ
ISIS ने मंगळवारी हा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. फॉली हे 2012 पासून बेपत्ता होते. अमेरिकेने हवाई हल्ले बंद केले नाही, तर त्यांच्या ताब्यात असणा-या दुस-या पत्रकाराचीही हीच अवस्था केली जाईल असा इशारा या व्हिडीओत देण्यात आला होता. दरम्यान, फॉली यांच्या इंग्रजी बोलण्याची पद्धत ब्रिटीशांप्रमाणे होती. त्यामुळे तो ब्रिटीश नागरिक असण्याची शक्यता असल्याचे, ब्रिटनच्या टेलिग्राफ या दैनिकात म्हटले आहे.
(व्हिडीओ पाहा अखेरच्या स्लाईडवर)

मृत पत्रकार जेम्स अखेरच्या वेळी 22 नोव्हेंबर 2012 मध्ये सिरियामध्ये आढळला होता. ते राष्ट्रपती बशर अल-असद यांच्या सैन्याच्या ताब्यात आहे, असे मानले जात होते. आयएसआयएसने त्यांच्या निर्घृण हत्येचा चार मिनिटांचा व्हिडीओ फर्कुन मीडिया चॅनल द्वारे यूट्यूबवर अपलोड केला आहे. आधी या यूट्यूब चॅनलचा वापर ISIS द्वारे संदेश देण्यासाठी आणि व्हिडीओ अपलोड करण्यासाठी केला जात होता. सध्या युट्यूबने त्यावर बंदी आणली आहे.

पुढे वाचा काय आहे व्हिडीओमध्ये...