आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रौर्याची परिसीमा - भीती पसरवण्यासाठी नागरिकांचे शीर कापून चौकात टांगताहेत ISIS दहशतवादी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दमिश्क - तुर्कस्तानच्या सीमेला लागून असलेल्या सिरियाच्या कोबानी शहरात सुरू असलेल्या युद्धात ISIS चे दहशतवादी लोकांचे शीर कापून ते चौकात टांगण्याचे क्रौर्य करत आहेत. निरपराध लोकांना भर रस्त्यात ठार केले जाते आहे. दहशतवाद्यांचा कोणी विरोध करू नये म्हणून ते हा प्रकार करत असल्याचे, बचावलेल्या लोकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, ISIS रासायनिक शस्त्रांचा वापर करत असल्याची शंका उपस्थित करणारे काही फोटो समोर आले आहेत. हे फोटो ISIS ने ठार केलेल्या कुर्दीश नागरिकांचे आहेत. मिडलईस्ट वॉचडॉगच्या रिपोर्टनुसार ISIS च्या हाती रासायनिक हत्यारे लागले असल्याची शक्यता आहे. पण अद्याप तसे सिद्ध झालेले नाही. ।

चौकांत टांगत आहेत शीर
दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटून तुर्कस्तानच्या मदत छावणीत पोहोचलेल्या 13 वर्षीय दिलयारने सांगितले की, कोबानीमध्ये दहशतवाद्यांनी शेकडो निरपराध लोकांना पकडून त्यांचे शीर कापून चौकात टांगले आहेत. लोकांमध्ये त्यांच्याबाबत भीती राहावी आणि कोणी विरोध करू नये म्हणून ते असे करत असल्याचे दिलयार म्हणाले आहेत.

'डोकी नसलेल्या मृतदेहांचा खच'
ISIS च्या तावडीतून पळालेल्या लोकांच्या मते, ते जेवढ्या निर्घृणपणे हत्या करतात त्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. त्यांनी सांगितले की, कोबानीमध्ये सगळीकडे शीर नसलेले मृतदेह आढळतात. त्यापैकी अनेकांचे डोळे काढण्यात आले आहेत. त्यातील बहुतांश कुर्द आहेत.

पुढील स्लाईड्वर पाहा, कोबानीमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे PHOTO