आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Chief Abu Bakr Al Baghdadi Appears For The First Time, Asks Followers To Fight

VIDEO: ISIS प्रमुख बगदादी प्रथमच जगासमोर येऊन म्हणाला, माझ्या आदेशाचे पालन करा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - इराक आणि सीरियाच्या अनेक भागांवर कब्जा करुन त्याला इस्लामिक राष्ट्र घोषित करणारी दहशतावादी संघटना आयएसआयएसचा (इस्लामिक स्टेट इन इराक अँड अल-शाम) प्रमुख अबु बकर अल-बगदादी प्रथमच जगासमोर आला आहे. संघटनेच्यावतीने इंटरनेटवर एक व्हिडिओ अपलोड केला गेला आहे. त्यात बगदादी जगभरातील मुस्लिमांना त्याच्या आदेशाचे पालन करण्याचे आणि युद्धात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहे. या व्हिडिओमधील व्यक्ती बगदादीच आहे, याला दुजोरा मिळालेला नाही. दुसरीकडे इराक सरकारने हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला आहे.
बगदादी म्हणाला, माझ्या आदेशाचे पालन करा
आयएसआयएसच्या वतीने अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये बगदादी म्हणतो, 'मी वली (नेता) आहे आणि तुमची मदत करत आहे. मी तुमच्यातील सर्वोत्तम नाही, त्यामुळेच जर तुम्हाला वाटले मी योग्य आहे तर मला मदत करा. जर तुम्हाला वाटले माझे चुकत आहे तर मला सल्ला द्या आणि योग्य मार्गावर आणा. जोपर्यंत मी 'खुदाचा हुक्म' मानत आहे, तुम्ही माझ्या आदेशाचे पालन करा.' या व्हिडिओमध्ये बगदादी आयएसआयएसकडून खुदाला खलिफा घोषित करणे योग्य असल्याचे मानत आहे. तो म्हणतो, 'अल्लाहने अनेक वर्षे चाललेल्या जिहादनंतर तुमच्या मुजाहिद बांधवांना विजय मिळवून दिला आहे. त्यांनी खिलाफतची घोषणा केली आहे आणि मला खलिफा निवडले आहे.'
प्रथमच समोर आला बगदादी
बगदादीचे दोनच छायाचित्र उपलब्ध आहेत. त्याला सार्वजनिकरित्या कधीही कोणीही पाहिलेले नाही. त्यामुळे या व्हिडिओतील व्यक्ती बगदादीच आहे याची पुष्टी झालेली नाही. मुस्लिम आंदोलनाचे तज्ज्ञ एमन अल-तमीमींचे म्हणणे आहे, की व्हिडिओच्या माध्यमातून तो प्रथमच समोर आला आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा व्हिडोओ...