आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Isis Executed 250 Syrian Soldiers And Beheaded Kurdish

ISISने 250 सैनिकांना दिली फाशी, मृतदेह जमिनीवर टाकून बनवला VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद/दमिश्क - गेल्या आठवड्यात सिरियाच्या रक्का एअरबेसवर कब्जा करणा-या ISIS च्या दहशतवाद्यांनी सिरियाच्या 250 सैनिकांची निर्घृण हत्या केली आहे. काही तासांपूर्वी जारी करण्यात आलेल्या एका व्हिडिओने यावर शिक्कामोर्तब झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार सर्व सैनिकांना फाशी देऊन त्यांची हत्या करण्यात आली आहे.

या व्हिडिओमध्ये शेकडो अर्धनग्न अवस्थेतील व्हिडिओ एका रांगेत पडलेले दाखवण्यात आले आहे. व्हिडिओ फुटेजच्या कॅप्शनमध्ये ठार करण्यात आलेल्या सैनिकांची संख्या 250 असल्याचे सांगण्यात आले आहे. रक्कामध्ये ISIS च्या एका दहशतवाद्याने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीने ISIS नेच यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

गुरुवारी सिरियाच्या मानवाधिकार पर्यवेक्षक संस्थेने दिलेल्या अहवालात मृतांची संख्या 120 पेक्षा अधिक असल्याचा दावा केला होता. ISIS च्या दहशतवाद्यांनी रविवारी तबका एअरबेसवर हल्ला केला होता. अनेक सैनिक आणि अधिका-यांची हत्या केल्याचा दावा दहशतवाद्यांनी केला होता. सीरियाच्या सरकारी माध्यमांनी तबका एअरबेसवर दहशतवादी हल्ल्या झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. मात्र त्यांनी हानीबाबत काहीही माहिती दिली नव्हती.
पुढे वाचा : जेम्स फॉलेनंतर एका कुर्दीश मुलाचा शीरच्छेत, ISIS ने जारी केला VIDEO..