आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Isis Executed 8 Iraqi Police Officers Who Infiltrated The Islamist Group Caught

ISIS ने केली आठ इराकी पोलिस अधिकार्‍यांची निर्घृण हत्या; बघा, जारी केलेले फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: आठ पोलिस अधिकार्‍यांची निर्घृण हत्या करताना ISIS चा दहशतवादी)

रक्का- इस्लामिक स्टेटने (ISIS) आठ जाबांज इराकी पोलिस अधिकार्‍यांची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होऊन हे अधिकारी इराक सरकारला त्यांच्या हालचालीविषयी गोपनिय माहिती देत होते.
'द डे ऑफ जजमेंट' च्या शिर्षकाखाली ISIS ने संबंधित पोलिस अधिकार्‍यांची हत्या करतानाची छायाचित्रे प्रकाशित केली आहेत. सर्व छायाचित्रे ISISने जारी केलेल्या व्हिडिओमधील असून अद्याप तो त्यांनी जारी केला नसल्याची माहिती मिळाली आहे.
ISIS ने जारी केलेल्या छायाचित्राच्या कॅप्शनमध्ये पोलिस अधिकार्‍यांचीही नावे दिली आहेत. याशिवाय पोलिस अधिकार्‍यांची हत्या करतानाची वैयक्तीक छायाचित्र देखील पाठवले आहे. सगळ्यांची हत्या करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी त्यांची व्हिडि्ओ क्लिप बनवली असावी.
इस्लामिक स्टेट मीडियानुसार, कॅप्टन होस्साम सलह नोश नामक अधिकारी या आठ जणांचे नेतृत्त्व करत होता. ISIS मध्ये सहभागी होण्यासाठी नोश यांच्यासह त्यांच्या सातही सहकार्‍यांनी सुन्नी इस्लाम स्वीकारला होता. आठ जणांचे पथक इराक सरकारच्या म‍िशनवर होते.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून बघा ISIS ने छायाचित्रे...