आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'ISIS' दहशतवाद्यांकडून सद्दाम हुसेनच्या महलाजवळ 200 इराकी जवानांची हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद- इराकमध्ये परिस्थिती आणखीच गंभीर झाली आहे. सुन्नी दहशतवादी संघटना 'आयएसआयएस'ने तीन दिवसांत जवळपास 200 पुरुष ओलिसांची हत्या केल्याचा दावा अमेरिकास्थित 'ह्युमन राइट्स' वॉचने केला.

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था 'ह्यूमन राइट्स वॉच'ने या नरसंहाराची छायाचित्रे व सॅटेलाइट इमेज प्राप्त झाले आहेत. 11 ते 14 जून यादरम्यान तिकरित शहरात सद्दाम हुसेनच्या महल परिसरात जवळपास 200 इराकी जबवानांची हत्या केली होती.

मृतांची संख्या जास्त असण्याची शक्यताही 'ह्यूमन राइट्स वॉच'ने व्यक्त केली आहे. दरम्यान, 12 जूनला आयएसआयएसने तिकरितमध्ये 1,700 शिया सैनिकांची हत्या केल्याचा दावा केला आहे. पुरावे म्हणून इंटरनेटवर छायाचित्रेही अपलोड केली आहेत. त्यात शस्त्रधारी दहशतवाद्यांकडून शेकडो ओलिसांची हत्या करताना दाखवण्यात आले आहे. नंतर 22 जूनला इराकचे मानवाधिकार मंत्री यांनी 175 जवानांची हत्या झाल्याचे सांगितले होते.

आयएसआयएसने 12 जूनला आपल्या कथित 'ट्विटर' अकाउंटवर शिया सैनिकांची हत्या केल्याची माहिती दिली होती. सुन्नी दहशतवाद्यांनी यासाठी एका व्हिडिओ ट्‍विटरवर अपलोड केला आहे. शेकडो ओलिसांची हत्या केल्याचे दाखवण्यात आले आहे. नंतर 14 जूनला दहशतवाद्यांनी 60 छायाचित्रे इंटरनेटवर पोस्ट केली होती. चेहर्‍यावर मास्क लावलेले दहशतवादी ओलिसांना एका ट्रकमध्ये बळजबरीने चढवताना दाखवण्यात आले आहे.

(फाइल फोटो: आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी 1700 इराकी जवानांची हत्‍या का दावा केला आहे. पुरावे म्हणून इंटरनेटवर छायाचित्रेही अपलोड केली आहेत.)