आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ISIS ने प्रथमच मान्य केला पराभव, पुन्हा कब्जा करण्याची दिली धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोबानी - ISIS या दहशतवादी संघटनेने प्रथमच आपला पराभव मान्य केला आहे. सीरियाच्या कोबानी शहरावर पुन्हा एखदा कुर्दीश सैन्याने ताबा मिळवल्याने आयएसने पराभव स्वीकारला आहे. ISIS समर्थक आमाक न्यूज एजंसीने एखा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यात चेहरा झाकलेल्या दहशतवाद्यांनी पराभव स्वीकारला आहे. अमेरिकीने केलेल्या वायूहल्ल्यामुळे कोबानीत पराभव झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेने गेल्या दोन दिवसांत केवळ कोबानीमध्ये 13 वायूहल्ले केले आहेत.

व्हिडिओमध्ये दहशतवाद्यांनी कोबानी शहरावर पुन्हा ताबा मिळवण्याची धमकीही दिली आहे. ISIS च्या दहशतवाद्यांनी कुर्दीश जवानांना आगामी काळात मोठ्या पराभरावा सामोरे जावे लागेल असे म्हटले आहे. ISIS च्या दहशतवाद्यांनी कुर्दीश जवानांना उंदीर संबोधले आहे. तसेच आगामी काळात मोठा पराभव करण्याची धमकीही दिली आहे. व्हिडिओमध्ये दोन्ही दहशतवादी आफ्रिकी लेहजामध्ये अरबी भाषा बोलताना दिसत आहेत. कुर्दीश अधिकार्‍यांनी कोबानीवर कब्जा केल्याची घोषणा केल्यानंतर हा व्हिडिओ समोर आला आहे.

यापूर्वी इराकच्या हादिथा डॅमवरही ISIS ला पराभवाचा सामना करावा लागला आहे. इराकी लष्कराने डॅमवर ताबा घेतला होता. त्यानंतरही ISIS च्या दहशतवाद्यांनी पराभव मान्य केला नव्हता.

ISIS ने सौदी अरबवर हल्ल्याची धमकी
ISIS च्या दहशतवाद्यांनी एका व्हिडिओद्वारे सौदी अरबवर हल्ला करण्याचा इरादा व्यक्त केला आहे. सौदी अरबमध्ये किंग अब्दुल्ला यांच्या निधनानंतर किंग सलमान यांनी देशाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हा व्हिडिओ समोर आला आहे. फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार इराक आणि सीरियाला जाऊन इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी झालेल्या सौदीच्या दहशतवाद्यांनी ही धमकी दिली आहे.

पुढील स्लाइड्वर पाहा, कुर्दीश लष्कराने कब्जा घेतल्यानंतरचे PHOTO