आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'सेक्स फॉर जिहाद'च्या नावाखाली ISIS दहशतवाद्यांचा लहान मुलींवरही बलात्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - आयएसआयएसचे दहशतवादी बंदी बनविलेल्या मुलींवर बलात्कार करत आहेत. 'सेक्स फॉर जिहाद' या कार्यक्रमाची माहिती सुरक्षा यंत्रणांचा खबरी झालेल्या एका दहशतवाद्याने दिली आहे.
खबर्‍याने दिलेल्या माहितीनुसार, आयएसआयएस दहशतवाद्यांना सांगितले गेले आहे, की अल्लाने त्यांना गैर-मुस्लिम बंदीवानांवर बलात्कार करण्याचा अधिकार दिला आहे. दहशतवाद्यांच्या ताब्यातील बलात्काराच्या शिकार झालेल्या अनेक मुलींचे वय 10 वर्षांपेक्षाही कमी आहे. खबर्‍याने सांगितले, की आत्मघातकी पथकासाठी तयार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना बंधक महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
आयएसआयएस दहशतवादी राहिलेल्या खबर्‍याने केले खळबळजनक खुलासे
- इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांना सांगितले जाते लढताना तुम्हाला मृत्यू आला तर, जन्नतमध्ये तुम्हाला '72 हूर' भेटतील.
- बंधक गैर-मुस्लिम मुली या लैंगिक शोषणासाठीच आहेत, अल्लाची देखील ही मर्जी आहे.
- सेक्स फॉर जिहादसाठी ज्या मुस्लिम मुली पुढे येतात आणि दहशतवाद्यांसोबत शारीरिक संबंध ठेवतात त्यांना बक्षीस दिले जाते. अशा महिलांना बहुतेक संघटनेच्या कमांडरसमोरच आणले जाते.
- आत्मघातकी पथकामध्ये परदेशी युवकांचा अधिक भरणा केला जातो. ते अल्लाला अधिक प्रिय असतात, असे काही नाही, तर ते इस्लामिक स्टेटच्या दुसर्‍या कोणत्याही कामात येऊ शकत नाहीत, असे खबर्‍याने सांगितले आहे. खबर्‍याने त्याचे नाव शेर्को उमर असल्याचे म्हटले आहे.
- त्याने सांगितले, 'ते अरबी बोलत नाही, त्यांना लढण्याचाही अनुभव नसतो. 'जन्नत मध्ये हूर' भेटेल एवढ्याच अपेक्षेने ज्यांनी जिहादमध्ये उडी घेतली आहे, ते बलात्कार करणारच. कारण त्यांना मरायचेच आहे.'
आयएसआयएसचा दहशतवादी राहिलेल्या इराकच्या या युवकाने कुर्दिश पत्रकार रोज अहमद यांच्यासमोर ही खळबळजनक माहिती उघड केली आहे. सुरक्षेच्या कारणामुळे त्याची खरी ओळख लपवण्यात आली आहे.
Your Middle East मध्ये प्रकाशित या मुलाखतीमध्ये उमरने सांगितले, त्याला अंधारात ठेवून संघटनेत आणले होते. त्याला सांगितले, होते की 'फ्री सीरियन आर्मी'मध्ये सहभागी होऊन सीरियाला राष्ट्राध्यक्ष बशर असदच्या तावडीतून मुक्त केले जाईल.
एका घटनेची माहिती देताना उमरने सांगितले, 'अल रक्का येथे माझ्या समोर एका ख्रिश्चन महिलेच्या पतीची गळाकापून हत्या करण्यात आली. जिहादींना त्या महिलेला आणि तिच्या मुलीला पत्नी करायचे होता. मुलीचे वय साधारण 12-13 वर्षे होते. मी त्या जिहादींना सांगितले, महिला आणि मुलींना त्यांच्या मर्जीविरुद्ध हात लावण्याची परवानगी इस्लाम देत नाही. मात्र, त्यांनी माझ्यावर बंदूक ताणली.
उमरचे म्हणणे आहे, की याच कारणांमुळे त्याने इस्लामिक स्टेट सोडण्याचा निर्णय घेतला.