आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएसचे झेंडे पाकमध्ये फडकल्याने इशारा, आयएसच्या प्रवक्त्याचा बलुचिस्तान दौरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादजवळ दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचे चार झेंडे फडकावण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. राजधानीतील या अतिसुरक्षित ठिकाणी आयएसचे अस्तित्त्व दिसल्यामुळे धोक्याचा इशारा मिळाला आहे.
ताक्सीला शहराजवळील पाकिस्तान शस्त्रनिर्मिती कारखान्याजवळ आयएसचे चार झेंेडे दिसून आले. यामुळे आयएस पाकिस्तानमध्ये पाळेमुळे रुजवण्याच्या प्रयत्नात असल्याची भीती व्यक्त होत आहे. आयएसच्या प्रवक्त्याने आग्नेय बलुचिस्तानमध्ये सक्रिय जुनदुल्लाह संघटनेची भेट घेतल्याचे वृत्त आहे. यानंतर आयएसचे झेंडे निदर्शनास आले आहेत. जुनदुल्लाह पाकिस्तान तालिबानची शाखा म्हणून कार्यरत आहे. या संघटनेने वाघा सीमेवरील स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती. या स्फोटात किमान ६३ लोक ठार झाले होते. आयएसच्या झेंड्याला स्थानिक प्रशासनाने दुजारो दिला आहे. अतिसुरक्षित क्षेत्रात झेंडे कोणी बसवले याची माहिती गुप्तचर यंत्रणांनाही नाही. सुरक्षा दलाने आयएसच्या हितचिंतकाचा शोध सुरू केला आहे. असे असले तरी या प्रकरणात अद्याप संशयिताला ताब्यात घेण्यात आले नाही. झेंडे बसवणारांची माहिती कळण्यासाठी निगराणी कॅमे-यांची मदत घेतली जात आहे. आयएसने इराक व सिरियातील बहुतांश भागावर कब्जा केला आहे.