आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ISIS चा डोळा भारतावर:जगावर कब्जा करण्यासाठी आखली पंचवार्षिक योजना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - इराकमध्ये हाहाकार पसरवल्यानंतर इस्लामिक स्टेट इन इराक अँड अल-शाम (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेचा डोळा आता भारतावर आहे. या संघटनेने नुकताच इंटरनेटवर याबाबत खुलासा केला आहे.

सोशल मिडियामध्ये सध्या एका नवीन नकाशामुळे खळबळ उडाली आहे. आयएसआयएसने हा नकाशा प्रसिद्ध केला असून त्यांनी जगभरातील कोणत्या देशांवर कब्जा करायचा याबाबत पंचवार्षिक योजना लागू केल्याचे सांगण्यात आले आहे.

वरील फोटोमध्ये दाखवण्यात आलेल्या या नकाशात जो भाग किंवा ज्या देशांना काळा रंग आहे, त्याठिकाणी आगामी पाच वर्षांमध्ये आयएसआयएसला कब्जा करायचा आहे. नकाशामध्ये आफ्रिकेचा वरील निम्मा भाग, इस्त्राइलसह संपूर्ण मध्य पूर्व, तुर्की, भारत, बांगलादेश आणि इंडोनेशिया चा पूर्वेकडील भाग यांना काळे करण्यात आले आहे.

सुन्नी दहशतवाद्यांनी इराकमध्ये केलेल्या क्रूर हल्ल्याचा उद्देश केवळ शिया पंथीयांना संपवणे एवढा नाही तर जगभरात दहशत आणि जेहादी विचार पसरवणे हा असल्याचे मानले जाते. माध्यमांमध्ये येणा-या वृत्तांनुसार आयएसआयएसला या योजनेद्वारे भारत, म्यानमार आणि ऑस्ट्रेलियाकडे कूच करायचे आहे.
या दहशतवादी संघटनेने इराकच्या दहापेक्षा अधिक शहरांवर ताबा मिळवला आहे. इराकी सैन्याला त्यांना रोखण्यात साफ अपयश आले आहे.

आयएसआयएस ज्या वेगाने इराकवर ताबा मिळवत आहे, त्यावरूनच त्यंच्या भविष्यातील योजनांचा अंदाज येत आहे. 2004 मध्येच सुन्नी कट्टरवाद्यांनी इराकला सुन्नी इस्लामिक स्टेट बनवण्याचा निर्णय घेतला होता. आयएसआयएस केवळ इराकसाठी नव्हे तर इतर देशांसाठीही धोकादायक ठरू शकते.
पुढे वाचा, सोशल मिडियाचा वापर
फोटो - ट्वीटरवर Ayman Mohyeldin नावाच्या व्यक्तीने पोस्ट केलेला नकाशा