आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO : जिहाद विरोधी असल्याचे सांगत ISIS ने केली 13 सुन्‍नींची निर्घृण हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - सुन्नींची हत्या केल्यानंतरचे चित्र
बगदाद - इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी इराकचे शहर तिकरितच्याजवळ 13 सुन्नींची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. हे सुन्नी जिहाद विरोधी असल्याचे सांगून त्यांची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे त्यांचे फोटोही ISIS ने जारी केले.

ISIS च्या सोशल मीडिया अकाउंट्सवर जारी करण्यात आलेल्या या फोटोंमध्ये सर्व मृतांनी नारंगी रंगाचे जंपसूट घातल्याचे दिसत आहे. त्यानंतर एका फोटोत जंपसूट घातलेले 11 व्यक्ती गुडघ्यावर बसलेले दिसत आहेत. तर त्यांच्या मागे आयएसआयएसचे दहशतवादी बंदुका घेऊन उभे असल्याचे दिसते. घटनास्थळी इस्लामिक स्टेटचे अनेक झेंडेही दिसून येत आहेत.

हे हत्याकांड तिकरित शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर दुपारी 3.30 वाजता घडल्याचे स्थानिकांनी एएफपी या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले. तिकरित-किरकूक मार्गावर अल-अलाम शहराजवळच्या चौकात हा प्रकार घडला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTO