आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS ने केला 150 यझीदी महिलांचा शीरच्छेद, सिरियामध्ये सापडले 250 मृतदेह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - 13 सुन्नींच्या निर्घृण हत्येच्या चार दिवसांनंतर ISIS ने सुमारे 150 महिलांची हत्या केली आहे. तुर्कस्तानच्या मिडियाच्या रिपोर्टनुसार जिहादींबरोबर विवाह करण्यास नकार दिल्यामुळे या सर्वांचा अशा प्रकारे शीरच्छेद करण्यात आला. यापैकी बहुतांश महिला आणि मुली यझदी आहेत.
मंगळवारी इराकच्या मानवाधिकार मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले त्यात पश्चिम इराकच्या अल-अनबर प्रांतातील दहशतवाद्यांनी शेकडो महिलांची निर्घृण हत्या केल्याचे वृत्त देण्यात आले. त्यानंतर त्यांना फल्जुजाहमध्ये एकत्र दफन करण्यात आले. मिडिया रिपोर्ट्सनुसार त्यापैकी अनेक महिला गर्भवती होत्या. दहशतवाद्यांच्या भीतीने शेकडो कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.

150 महिलांच्या हत्येप्रकरणी एक आरोपी जबाबदार
150 महिलांच्या निर्घृण हत्येसाठी इस्लामिक स्टेटचा दहशतवादी अबू अनस अल-लिबी याला जबाबदार ठरवण्यात आले आहे. 1998 मध्ये पूर्व आफ्रिकेच्या केनिया आणि तंजानियामध्ये दुतावासात स्फोट झाले होते. त्यामागेही अल-लिबी चा हात होता. या घटनेत 224 ठार झाले होते.
सोमवारी इराकच्या मानवाधिकार मंत्रालयाच्या एका अहवालात स्पष्ट करण्यात आले की, ISIS ने मोसूल आणि आसपासच्या शहरांच्या मशीदींमध्ये आठ पानांचे ब्राऊशर्स वाटप केले आहे. यात बंधक बनवण्यात आलेल्या महिलांना दिल्या जाणा-या वागणुकीबाबत गाइडलाइन्स आहेत.

पूर्व सिरियामध्ये आढळली मोठी कबर
पूर्व सिरियाच्या देर एजर प्रांतात एक मोठी कबर आढळून आली आहे. त्यात 230 हून अधिक मृतदेह दफन करण्यात आले आहेत. ISIS नेच या सर्वांची हत्या केली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.