आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ISIS Killed Women Activist For Criticizing On Facebook

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ISIS वर फेसबूकद्वारे टीका; मानवी हक्कासाठी लढणा-या महिलेची खुलेआम निर्घृण हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : इराकच्या मानवाधिकार कार्यकर्त्या समीरा सालीह अल-नुएमी.

बगदाद - ISIS च्या दहशतवाद्यांनी फेसबूकद्वारे त्यांच्यावर टीका करणा-या एका महिला मानवाधिकार कार्यकर्त्यांची खुलेआम निर्घृण हत्या केली आहे. समीरा सालीह अल-नुएमी यांची हत्या करण्यापूर्वी सुमारे एक आठवडाभर त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला. दहशतवाद्यांनी अल-नुएमी यांच्या हत्येनंतर त्यांचे फेसबूक पेज डिलीट केल्याचेही सांगण्यात येत आहे. संयुक्‍त राष्‍ट्रांनी दहशतवाद्यांवर तीव्र टीका केली आहे.

पती-मुलांसमोर घरून उचलून नेले
अल-नुएमी इराकच्या मोसूल शहरात राहत होत्या. त्या फेसबूकद्वारे दहशतवाद्यांच्या विरोधात आंदोलन चालवत होत्या. दहशतवाद्यांनी इराकच्या शहरांवर कब्जा केल्यानंतर धार्मिक स्थळांचे जे नुकसान केले त्याविरोधात त्या फेसबूकवर टीका करत होत्या. त्यांनी ISIS कट्टर असल्याचेही म्हटले होते. त्यानंतर 17 सप्टेंबरला त्यांचे घरातून अपहरण करण्यात आले. त्यावेळी त्यांचे पती व मुलेही घरीच होती.

शरिया कोर्टाचे फर्मान
अपहरण केल्यानंतर त्यांना एका गोपनीय ठिकाणी नेण्यात आले. त्याठिकाणी त्यांच्यावर अनेक अत्याचारही केले. काही दिवसांनंतर त्यांना शरिया कोर्टात हजर करण्यात आले. त्याठिकाणी त्यांना सार्वजनिकरित्या फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. अल-नुएमी यांची हत्या 22 सप्टेंबरलाच करण्यात आली होती. पण 25 सप्टेंबरला अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर हे प्रकरण उघड झाले होते.


पुढील स्लाइड्सवर पाहा, इराकमधील स्थितीची छायाचित्रे...