(ISISच्या दहशतवाद्यांनी नरसंहाराचे छायाचित्र)
बगदाद- ISIS अर्थात इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी अल-बु निम्र जमातीच्या 322 सुन्नी लोकांचा सामूहिक नरसंहार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
इराक सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये बहुतांश महिला आणि चिमुरड्यांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी महिला व मुलांची हत्या करून सगळ्यांचे मृतदेह विहिरीत फेकून दिले आहेत.
मागील काही महिन्यांपासून
इराक आणि सीरियामध्ये खूनी संघर्ष सुरु आहे. इराकमधील अनेक शहरे ISIS ने ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे ISIS च्या दहशतवाद्यांवर नियंत्रण मिळवणे इराक सरकारला अवघड होऊन बसले आहे.
अल-बु निम्र कबील्याचा नेता शेख नईम अल-गाउद याने सांगितले की, रविवारी(2 नोव्हेंबर) इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी कबील्यातील 75 लोकांची गोळ्या घालून हत्या केली. तर मृतांची संख्या जवळपास 322 असल्याचे इराकच्या मानवाधिकार मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. हदीथाजवळ एका विहिरीत 50 महिला आणि लहान मुलांचे मृतदेह आढळून आल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.
अल-बु निम्र कबिल्यातील लोक सुन्नी जमातीचे असून ते इस्लामिक स्टेटच्या विरोधात लढा देत आहेत. पश्चिम अनबर प्रांतात या लोकांनी इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांना अनेक आठवडे रोखून धरले होते. मात्र, दहशतवादांविरोधात लढा देताना त्यांच्याकडून दारुगोळा संपुष्टात आला. नंतर अल-बु निम्रचे योद्धांना मागे सरकावे लागले. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी कबिल्यातील शेकडो लोकांची हत्या केली.
शेख नईम अल-गाउद यांनी सांगितले की, अनबर प्रांतात दहशतवाद्यांविरोधात लढणारे 50 सुन्नी लोकांची शुक्रवारी (31 ऑक्टोबर) हत्या करण्यात आली होती. थरथर तळ्याकाठी रक्ताच्या थारोळ्यात सगळ्यांचे मृतदेह आढळून आले होते. या नरसंहारच्या पार्श्वभूमीवर इराकचे पंतप्रधान हैदर अल-अबादी यांनी हदीथा येथील ISISच्या दहशतवाद्यांचवर हवाई हल्ल्याचे आदेश दिले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, हत्या आणि खूनी संघर्षाचा आठवडा...