आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ISIS Militants Attack Iraq Air Base As US Teams Deploy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इराकमधील एअरबेसवर ISIS हल्ला; बगदादमध्ये पोहोचले अमेरिकन सैनिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद- इराकमधील सगळ्यात मोठ्या एअरबेसवर (आयएसआयएस) दहशतवाद्यांनी हल्ला चढविला आहे. दहशतवाद्यांनी 'कॅम्प अॅनाकोंडा' वायुसेनेच्या ठिकाणावर मोटारने हल्ल्या केला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या या एअरबेसला दहशतवाद्यांनी तिन्ही दिशांने घेरले आहे. दुसरीकडे सुन्नी दहशतवाद्यांविरूद्ध गेल्या काही दिवसांपासून संघर्ष करत असलेल्या इराकला मदत करण्‍यासाठी अमेरिकेचे सैनिक इराकमध्ये पोहोचले आहे.

अल कायदा या दहशतवादी संघटनेपासून वेगळे झालेल्या 'इस्लामिक स्टेट इन इराक अॅण्ड अल शाम' या संघटनेच्या दहशतवाद्यांनी संपूर्ण इराक ताब्यात घेण्‍याची धमकी दिली आहे. संकटात सापडलेल्या इराकमधील सध्याची स्थिती जाणून घेण्यासाठी बगदादमध्ये पोहोचलेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन कॅरी यानी कुर्दिश क्षेत्रातील नेत्यांना देशाला संरक्षण देण्याबाबत आवाहन केले आहे. जॉन कॅरी म्हणाले, बगदादमध्ये आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी भीषण दहशतवादी हल्ला केला असताना कुर्दिशमधील नेत्यांनी शिया सरकारची मदत करणे आवश्यक आहे.

बगदादपासून 70 किलोमीटर अंतरावरील याथरिबमध्ये बुधवारी आयएसआयएसचे दहशतवादी आणि इराकी सैन्यात चकमक झाली. यात चार दहशवादी ठार झाले. याआधी आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी उत्‍तर इराकमधील गावांमध्ये मोठ्याप्रमाणात हिंसाचार केला.
अमेरिकेने हल्ला केला तर इराकमधील अन्य नागरिकांना सोडणार नाही- आयएसआयएस
स्वत:चा 'लीग ऑफ सपोटर्स' असा प्रचार करणार्‍या सुन्नी दहशतवाद्यांनी अमेरिकेला खुलेआम धमकी दिली आहे. अमेरिकेने आयएसआयएलच्या दहशवाद्यांवर हवाई हल्ला चढवला तर त्याचा परिणाम वाईट होईल, असे जवळपास 21 हजार ऑनलाइन समर्थकांनी 'ट्विटर' माध्यमातून चेतावणी ‍दिली आहे.

(सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्‍यासाठी बगदादच्या पश्चिम भागात तैनात इराक सेक्युरिटी फोर्सचा रणगाडा)