आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ISIS Militants Attack Iraq Air Base As US Teams Deploy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इराकमध्ये गावे ओस, ख्रिश्चनांना लक्ष्य; आयएसआयएलची दहशत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - सुन्नी दहशतवाद्यांच्या कारवाया वाढत असतानाच गुरुवारी उत्तरेकडील अनेक गावे ओस पडल्याचे चित्र दिसू लागले आहे. दहशतवादी कलक गावाच्या दिशेने चढाई करत असल्याची माहिती मिळताच शेकडो गावकर्‍यांनी जीव मुठीत घेत बालबच्च्यांसह सुरक्षित ठिकाणी आपले बस्तान हलवले. त्यात ख्रिश्चन नागरिकांचा समावेश आहे. कुर्दीश भागात त्यांनी आर्शय घेतल्याचे सांगण्यात येते. स्वतंत्र राज्यात गेल्या काही दिवसांत विस्थापित वाढले आहेत.
देशातील सर्वात मोठय़ा दुसर्‍या क्रमांकाचे शहर मोसूलपासून काही अंतरावरील शियाबहुल गावात अनेक विस्थापितांनी आर्शय घेतला आहे. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट या सुन्नी दहशतवादी संघटनेने सीमेवर अधिकच दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तरेकडील बहुतांश ख्रिश्चन गावांना सुन्नी दहशतवाद्यांनी लक्ष्य केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ख्रिश्चन समुदाय अधिक असलेली गावे सध्या ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळते. सरकार नागरिकांना सुरक्षेचे कोणतेही ठोस आश्वासन देऊ शकत नाही. हमादानिया परिसरात गुरुवारी सकाळपासून प्रचंड गोळीबार करण्यात आला. शेजारी गावातील गोळीबाराच्या आवाजाने बाजूच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जावे लागले.

उत्तर भागात हिंसाचार वाढला
सूड घेण्याची भीती
माझ्यासह शेकडो नागरिकांनी आमची मूळ गावे सोडली आहेत. सुरक्षित असलेल्या प्रांतात आम्ही आर्शय मिळावा म्हणून प्रयत्न करत आहोत. 10 जून रोजी दहशतवाद्यांनी आमच्या गावावर हल्ला केला होता. त्याचा अंदाज आल्यानंतर आम्ही गावातून स्वत:ची अगोदरच सुखरूप सुटका करून घेतली. सुन्नी दहशतवादी त्यामुळे खवळले आहेत.
-उम अला, गावकरी, कुबा.
हल्ल्याचे स्वागत : मलिकी
इराकच्या सरहद्दीवर सुन्नी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सिरियाने पुढाकार घेतला आहे. या कृतीचे आम्ही स्वागत करतो, असे सिरियाचे पंतप्रधान नूर अल-मलिकी यांनी म्हटले आहे. अल-कइम शहराच्या जवळ झालेल्या हवाई हल्ल्यात दहशतवाद्यांच्या तळाला लक्ष्य करण्यात आले.
इराकी शिया समुदायाने कारबाला या देशाच्या मध्यवर्ती प्रदेशात धार्मिक स्थळांचे संरक्षण करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने शस्त्रे उचलली.

‘लष्करी-राजकीय पातळीवर प्रश्न सोडवा’
संयुक्त राष्ट्र - इराकमधील प्रश्न सोडवण्यासाठी लष्करी तसेच राजकीय पातळीवर प्रयत्न करण्याची गरज संयुक्त राष्ट्राने गुरुवारी व्यक्त केली. सरचिटणीस बान की मून यांचे विशेष प्रतिनिधी निकोले म्लाडेनोव्ह यांनी पत्रकार परिषदेत संयुक्त राष्ट्राची ही भूमिका स्पष्ट केली. त्या अगोदर राष्ट्रीय पातळीवर चर्चा, एकजूट यांचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. त्यातूनच मार्ग काढता येईल.