आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ISIS Militants Declare Establishment Of 'Caliphate', Russia Supplies Fighter Planes To Iraq

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ISIS दहशतवाद्यांची स्वतंत्र इस्लामी राष्ट्राची घोषणा, म्होरक्याला ठरवले खलिफा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - इराकसह संपूर्ण जदगभरासाठी धोका ठरत असलेल्या आयएसआयएस(इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड अल-शाम) या दहशतवादी संघटनेने इराक आणि सिरियामध्ये त्यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशाची स्वतंत्र मुस्लीम राष्ट्र म्हणून घोषणा केली आहे. संघटनेचा म्होरक्या अबू-अल-बगदादी हा राष्ट्राचा नवीन खलीफा असेल असेही घोषित करण्यात आहे. दरम्यान, दहशतवाद्यांना तोंड देण्यासाठी रशियाने इराकला सुखोई लढाऊ विमाने पुरवली आहेत.
इस्लाम देशाची घोषणा
आयएसआयएसचा प्रवक्ता अबू मोहम्मद अल अदनानीने इंटरनेटवर एका ऑडियो क्लीपद्वारे नव्या इस्लाम राष्ट्राची घोषणा केली. 'संघटनेचे प्रमुख अबू-अल-बगदादी हे इस्लामी राष्ट्राचे खलिफा आहेत. सुरा काऊन्सिलच्या बैठकीनंतर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.' या घोषणेबरोबरच नवीन देशाच्या खलिफांप्रती निष्ठेची शपथ घेऊन त्यांचे समर्थन करण्याचे आवाहन इतर जेहादी संघटनांना करण्यात आले आहे. अधिकृत कागदपत्र आणि दस्तऐवजातून इस्लामिक स्टेटसह 'इराक' आणि 'लेवांट' या शब्दांना काढून टाकण्यात आले आहे असेही अदनानीने जाहीर केले.
रशियाने पाठवली लढाऊ विमाने
आयएसआयएसच्या दहशतवाद्यांशी लढायला मदत म्हणून रशियाकडून इराकला लढाऊं विमानांचा पुरवठा करण्यात आला आहे. ही नवीन सुखोई-25 विमाने लवकरच इराकच्या सेवेच हजर होतील. याआधी इराकचे पंतप्रधान नूरी अल मलिकी यांनी त्यांचा देश रशियाकडून एक डझन लढाऊ विमाने खरेदी करत असल्याचे सांगितले होते.
9 जणांची निर्घृण हत्या
सिरियाच्या अलेप्पो प्रांतात आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी सर्वांसमोर 9 जणांची हत्या केली आहे. यापैकी आठ विद्रोही राष्ट्रपती बशर अल-असदचे सरकार आणि जेहादींशी लढत होते. ब्रिटन स्थित सिरिया मानवाधिकार संघटनेने याबद्दल माहिती दिली.
फोटो - इराक युद्धादरम्यानचा फाईल फोटो