नवी दिल्ली- 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सीरिया'च्या (आयएसआयएस) दहशतवाद्यांनी 30 इराकी जवानांची हत्या केल्याचे वृत्त आहे. यासोबत दहशतवाद्यांनी सीरियाच्या सीमेवरील चेकपोस्टचा ताबाही घेतला आहे. इराकी सुरक्षा अधिकार्यांनी शनिवार सांगितले, की दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये दिवसभर चकमक सुरु होती. त्यात जवळपास 30 जवान शहीद झाले आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना 'एमनेस्टी इंटरनॅशनल'ने सांगितले की, इराकमध्ये अटकलेल्या भारतीय नागरिकांचे पारपत्रक (पासपोर्ट) जब्त करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व भारतीय नागरिक इराकमध्येच अडकले आहेत.
इराक-सीरिया सीमेवर दहशतवाद्यांचा ताबा
सीरियाच्या सीमेवरील काइम शहरातील चेकपोस्टचा दहशतवाद्यांनी ताबा घेतला आहे. पंतप्रधान नूरी अल मलिकी यांचासाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. इराकची राजधानी बगदादपासून 320 किलोमीटर अंतरावर हा चेकपोस्ट आहे. पोलिस आणि सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांना रोखण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु अखेर आयएसआयएसने चेकपोस्टचा ताबा घेतला. चेकपोस्टवर ताबा घेतल्याचे सीरियातून शस्त्र आणण्यासाठी दहशतवाद्यांना खूप फायदा घेणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे...