आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Move Back From Syrian City Koben, Divya Marathi

'ISIS'ची कोबेनमधून माघार; कुर्दीश, अमेरिकी हवाई हल्ल्यापुढे पळता भुई थोडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैरत - गेल्या पंधरा दिवसांपासून सिरिया सैन्य, कुर्दीश लष्कर आणि अमेरिकी हवाई दल यांनी सातत्याने केलेल्या हल्ल्यानंतर इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने सिरियातील महत्त्वाच्या कोबेन शहरातून पळ काढला. त्यामुळे अमेरिकेच्या दृष्टीने हे यश मानले जाते.
व्यूहरचनेच्या पातळीवर सिरियातील पूर्वेकडील कोबेन हे शहर अतिशय महत्वाचे मानले जाते.
आयएसच्या दुर्गम भागातील अनेक तळांवर अमेरिकी हवाई दलासह कुर्दीश आंदोलकांनी अचूकपणे हल्ले चढवले. त्यात तळ नष्ट झाले. सोमवारी रात्रीच कुर्दीश सशस्त्र दल कोबेनमध्ये दाखल झाले होते. कोबेन हे देशातील तिस-या क्रमांकाचे कुर्दीश शहर आहे. अनेक दिवसांपासून येथे संघर्ष सुरू असल्याने शहरातील रस्त्यांवर सर्वत्र मृतदेहांचे खच पडल्याचे दिसून येत आहे. १६ सप्टेंबरपासून येथे संघर्ष सुरू आहे. हिंसाचारामुळे या भागातील सुमारे १ लाख ८६ हजार नागरिकांना प्रांतातून सुरक्षित स्थळी जावे लागले आहे. आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात ४१२ जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते.

पोलिस-कुर्द संघर्ष
कुर्दीश आंदोलक आणि पोलिसांच्या झटापटीत कमीत कमी १४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. पूर्व तुर्कस्तानातील कुर्दीश वस्तीत मंगळवारी हिंसाचार उसळला. सिरिया तुर्की सीमेवरील इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी कुर्दीश नागरिकांची मागणी आहे.

सर्वात हिंसक शाखा
संयुक्त राष्ट्रांच्या मते, अरब द्वीपकल्पात जागतिक पातळीवरील जिहादींचे जाळे असलेली अल कायदाची सर्वात हिंसक शाखा असून, त्यांनी आता हुथी बंडखोरांविरोधात लढा पुकारून सुन्नी पंथीयांना साथ देण्याचे ठरवले आहे. येमेन हे तेल खाणींनी संपन्न असलेल्या सौदी अरेबियाच्या सीमेवरील गरीब राष्ट्र आहे.

सुरक्षा दलावर हल्ला, १० पोलिस ठार
येमेनमध्ये सुरक्षा दलावर बुधवारी झालेल्या हल्ल्यात दहा पोलिसांचा मृत्यू झाला आहे. अल कायदाच्या संशयित आत्मघातकी अतिरेक्यांनी हा हल्ला घडवल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. बैदा शहरात उसळलेल्या हिंसाचारामुळे पोलिस पोस्ट आणि लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले.