इस्लामाबाद - इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (आयएसआयएस) ही दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये आपला प्रभाव वाढवत आहे. यासाठी ती पेशावर आणि अफगाणिस्तान सीमेवरील प्रांता पत्रक वितरित करुन जिहाद करिता पाठिंबा देण्याचे आवाहन करत आहे. पश्तो आणि दारी भाषेतील फतह ( विजय) नावाची पुस्तिका पेशावरमध्ये वितरित करण्यात आली.
पेशावर ही खैबर-पख्तूनख्वाची राजधानी आहे, असे वृत्त द एक्स्प्रेस ट्रायबूनने दिले. पत्रकावर महम्मद पैगंबर यांचे कलमा आणि बंदूकीचे चिन्ह आहे.काही प्रति गूढपध्दतीने अफगाण पत्रकाराला पाठवण्यात आली. जो पेशावरमध्ये काम करत आहे, असे वृत्तपत्राने सांगितले. पत्रकाच्या शेवटी बनावटी संपादकाचे नाव आहे.मात्र ते कोणत्या ठिकाणावरुन प्रसिध्द करण्यात आले याविषयी कोणतीही माहिती मिळत नाही.
काही वर्षांपासून अफगाण दहशतवादी गट हक्कानी नेटवर्क आणि हिझ-ए- इस्लामी यांनी अशाच प्रकारचे पत्रके, मासिके आणि प्रचार साहित्य पेशावरच्या काळ्या बाजारात प्रकाशित केलेले आहे. आयएसआयएने पत्रकांमधून स्वत:चा दौलत-ए-इस्लामिया( इस्लामिक स्टेट) असा उल्लेख केला आहे. त्यात स्थानिकांना स्वत:च्या लढाईला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. त्यामुळे इस्लामिक खिलाफत स्थापन केले जाईल.