(फाइल फोटो: आयएसआयएस दहशतवाद्यांनी नुसकतेच इराकमध्ये राहत असलेल्या ख्रिश्चन समुदायांना देश सोडण्यास सांगितले होते. त्या निर्णयाच्या विरोधात निदर्शन करताना महिला)
जिनेवा- सुन्नी दहशतवादी संघटना आयएसआयएसने
इराकमधील महिलांच्या विरोधात एक फतवा जारी केला आहे. या फतव्यात सांगण्यात आले, की 11 ते 46 या वयातील सर्व महिलांचा खतना करावा लागणार आहे. दहशतवादी संघटनेच्या या आदेशाने इराकच्या 40 लाखांपेक्षा जास्त महिला प्रभावित होऊ शकतात. आयएसआयएसने इकारच्या अनेक भागावर ताबा मिळवला आहे. ताबा मिळवलेल्या भागांना त्यांनी इस्लामिक राष्ट्र घोषित केले असून त्यांचे नियम आणि कायदे लागू करत आहे.
असा आहे आयएसआयएसचा फतवा
संयुक्त राष्ट्राच्या एका अधिका-याने सांगितले, की हा फतवा इराकच्या शहर आणि नाइनवेह प्रदेशाची राजधानी मोसुलसाठी जारी करण्यात आला आहे. अधिका-याने असेही सांगितले, 'इराकमध्ये खतना करणे जवळपास नाहीच्या बरोबरीत आहे. फक्त काहीच भागात असे केले जाते. आम्हाला माहित झाले आहे, की आयएसआयएसने याविषयी फतवा काढला आहे. यापासून किती महिला आणि तरुणी प्रभावित होतील माहित नाही. परंतु लोकसंख्या संबंधित संयुक्त राष्ट्राच्या आकड्यांकडे बघितले तर जवळपास 40 लाख महिला आणि तरुणी प्रभावित होऊ शकतात.'
इस्लामचा अपमान?
भारतीय मुस्लिम धर्मगुरुंनी आयएसआयएसच्या या निर्णयाला इस्लामचा अपमान असल्याचे सांगितले आहे. शिया धर्मगुरु मौलाना सैफ अब्बास यांनी सांगितले, 'रमजानच्या या पवित्र महिन्यात कुणाच्याही भावनांना ठेच पोहोचवणे चुकिच आहे. खतनासंबंधी आयएसआयएसचा हा निर्णय इस्लामचा अपमान आहे.' दारुल उलूम देवबंदचे अशरफ उस्मानी यांनी सांगितले, 'भारतात खतना सुरुवातीपासून होता. पण तो केवळ कार्यान्वीत करण्यात आला नव्हता.'
(पुढे पाहा : छायाचित्रांमध्ये इराकची सद्यस्थिती...)