आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टूरिस्ट आणि विदेशी नागरिकांना यातना देऊन मारण्याचा ISISचा इरादा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: अपहृत पीटर कासिंगसोबत‍ ISIS चा दहशतवादी)

लंडन- दहशतवादी संघटना 'इस्लामिक स्टेट इन इराक अँड सीरिया'ने (ISIS) ब्रिटिश लष्कर आणि पोलिसा खात्यात घुसखोरी करण्याच्या हलचाली सुरु केल्या आहेत. तसेच सीरिया आणि इराकमधील टूरिस्ट आणि विदेशी नागरिकांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्‍याचा जिहादींचा इरादा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ISIS ने जारी केलेली 268 पानांची 'हॅन्डबुक'मध्ये हा खुलासा करण्यात आला आहे.
यापूर्वी ISIS ने ब्रिटनमधील डेव्हिड हेन्स याचे शिर कलम केल्याचा व्हिडिओ जारी केला होता. ISIS ने आतापर्यंत हेन्ससह एकूण चार व्यक्तीचा शिरच्छेद केला होता. सगळ्यात ISIS च्या दहशवाद्यांनी अमेरिकन पत्रकार जेम्स फॉली, नंतर स्टीव्हेंस सोटलॉफचे शिर कलम केल्याचा दावा व्हिडिओ जारी करून केला होता.

ISIS चे हॅन्डबुक...
'द मॅनेजमेंट ऑफ सॅव्हेझरी' या शिर्षकाखाली ISIS ने एक नियमावली तयारी केली आहे. ISIS चा म्होरक्या अबुबक्र नाजी याने ती लिहिली आहे. ब्रिटिश अपहृत डेव्हिड हेन्स आणि ऐलन हेनिंग यांचा शिरच्छेद करण्‍यामागे ISIS ची मोठी रणनिती आखाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

ब्रिटिश लष्करात घुसखोरी करण्याचा प्रयत्न...
गुप्तचर संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, ISIS च्या दहशवाद्यांचा ब्रिटिश लष्कर आणि पोलिस खात्यात घुसखोरी करण्‍याच्या प्रयत्न सुरु आहे. पोलिस, आर्मी, खासगी सुरक्षा कंपनी तसेच संवेदनशील संस्थांमध्ये घुसखोरी करून पाश्चिमात्य देशात मोठी हिंसा पसरवण्याचा इशारा 'ब्लेजिंग बॅटल' या शिर्षकाखाली नाजी याने दिली आहे.

- इस्लामिक जगतात पर्यटकांना टार्गेट करणे.
- पाश्चिमात्य देशातील पत्रकारांना वेठीस धरून त्यांच्या माध्यमातून प्रचार करणे.
- ऑईल फील्डमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे अपहरण करणे.

नाजीने जिहादींना ऑईलफील्ड, समुद्र, विमानतळ, पर्यटन सुविधा आणि बॅंकिंग आणि अर्थिक क्षेत्राला निशाणा करण्‍याचे आवाहन केले आहे. सौदी अरब, पाकिस्तान, यमन, तुर्की, जॉर्डन, लीबिया, ट्यूनीशिया अराणि मोरक्कोसारख्या देशांना 'इस्लामिक स्टेट' बनवण्याचा ISISचा इरादा असल्याचे नाजीने म्हटले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, इराक आणि सीरियामधील सध्याची परिस्थिती...