आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ISIS Planning To Destroy A Major Dam In Iraq That Will Cause Blackout And Flooding,Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ISIS च्‍या दहशवादी हल्‍ल्‍याची सहा महिन्‍यापूर्वीच अमेरिका-इराकला माहिती?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - इराकमध्ये सुन्नी दहशतवाद्यांनी इस्‍लामिक स्‍टेट इन इराक अल-शामने (आयएसआयएस) कित्‍येक शहरांवर आपला ताबा मिळविला असून इराक उध्‍वस्‍त करण्‍याची त्‍यांनी योजनाच तयार केली आहे. या सर्व योजनेची पूर्वकल्‍पना अमेरिका आणि इराकला सहा महिन्‍यापूर्वीच होती असे खळबळजनक विधान कुद्रीस्‍तानच्‍या पंतप्रधनांनी केले आहे.
पंतप्रधानानी दावा केला आहे की, इराकमधील हदीथा शहरानजीक असलेल्‍या धरणाला नुकसान पोहोचवण्‍याच्‍या तयारीत असून याची म‍ाहिती सहा महिन्‍यांपूर्वीच अमेरिका आणि इराकला होती. परंतु याकडे डोळेझाक केली आहे. या दहशतवादी कारवाईचे पडसाद मध्‍य पूर्व देशांमध्‍ये किती भयंकर पडणार आहेत यावर वार्तालाप करण्‍यासाठी अमेरिकेचे परराष्‍ट्र मंत्री जॉन केरी इजिप्‍त दौ-यावर आहेत.
धरण उध्‍वस्‍त करण्‍याची योजना
इराकमधील हदीथा शहरानजीक असलेले धरणाला जर दहशतवाद्यांनी उडविले तर इराकमधील कित्‍येक शहरे पाण्‍याखाली जातील. तसेच इराकवर विजेचे संकट उद्भवू शकते. या संभावित धोक्‍याला टाळण्‍यासाठी इराकने धरण्‍याच्‍या सुरक्षेसाठी 2000 हजार सैनिक तैणात केले आहेत.
सिरियाचा दहशतवाद्यांवर हल्‍ला
सिरियाने इराकच्‍या सीमारेषेवर ISIS च्‍या दहशतवाद्यांवर बॉम्‍बवर्षाव केला आहे. या हल्‍ल्‍यामध्‍ये अंदाजे 12 दहशतवादी मारल्‍या गेल्‍याचे तर काही दहशतवादी जखमी झाल्‍याचे वृत्‍त आहे. प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितल्‍यानुसार, सिरियाने लढावू विमानाच्‍या सहाय्याने दहशतवाद्यांनी काबीज केलेल्‍या जागेवर हल्‍ला चढविला आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, इराकमधील दहशतवाद्याविरोधात सुरु असलेल्‍या कारवाईची छायाचित्रे..