आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Plans To Attack On Iran And Seize It's Nuclear Secrets With The Help Of Russia

'रशियाच्या मदतीने इराणवर हल्लाकरुन अणुबॉम्ब हस्तगत करण्याची ISIS ची इच्छा'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - सीरिया आणि इराकमध्ये नरसंहार घडवून आणणारी सुन्नी दहशतवादी संघटना आयएसआयएसची इराणवर हल्ला करून अणु कार्यक्रमाशी संबंधीत गुप्त कागदपत्र आणि बॉम्ब बळकावण्याची योजना आहे. त्यासोबत नाझींनी घडवून आणलेल्या हत्याकांडाप्रमाणे इराण आणि मीडल इस्टमधली शिया मुस्लिमांचा खात्मा करुन इस्लामिक स्टेटची स्थापना करण्याची त्यांची इच्छा आहे. यासाठी त्यांना रशियाची मदत हवी आहे. आयएसआयएसचे गुप्त दस्तऐवज गुप्तचर संस्थांच्या हाती लागले आहे, त्यातून हा खुलासा झाल्याचे ब्रिटनचे वृत्तपत्र 'द संडे टाइम्स'च्या वृत्तात म्हटले आहे.
काय आहे गुप्त दस्तऐवजांमध्ये?
'द संडे टाइम्स'च्या वृत्तानुसार, आयएसआयएसच्या या गुप्त दस्तऐवजांना संघटनेचा कमांडर अब्दुल्ला अहमद अल-मेशेदानी आणि संघटनेच्या वॉर कांउन्सिलच्या सदस्यांनी एकत्रितरित्या तयार केले आहे. त्यात म्हटले आहे, की संघटना रशियाच्या मदतीने इराणवर हल्ला करु इच्छित आहे, आणि त्यांच्या अणु कार्यक्रमाशी संबंधीत माहिती त्यांना हवी आहे. इराणवरील हल्ल्याच्या मोबदल्यात रशियाला आयएसआयएस इराकमधील त्यांच्या ताब्यातील गॅस आणि तेल क्षेत्र देण्याची शक्यता आहे. त्यासोबतच रशियाकडून ते सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना सत्तेवरुन हटविण्यासाठी मदत मागू शकतात. इराणमधून शिया सरकारला हटवून सुन्नी सरकार स्थापन करणे आणि मीडल इस्टमध्ये सुन्नी सरकारला समर्थन देण्याची ते मागणी रशियाला करण्याची शक्यता आहे.
नाझी स्टाइल हत्याकांड घडवायचे आहे आयएसआयएसला
आयएसआयएस मध्ये परदेशी तरुणांना भरती करण्यात महत्वाची जबाबदारी असणारा अब्दुल्ला अहमद अल-मेशेदानी आहे. गुप्तचर संस्थांच्या हाती लागलेल्या दस्तऐवजांवरुन आयएसआयएस शिया मुस्लिमांचे हत्याकांड करण्यासाठी नाझींची पद्धत अवलंबण्याची शक्यता आहे.

रशियाच्या मदतीने इराणने तयार केला अणु कार्यक्रम
इराणमधील बुशेह येथील अणुसंयंत्र रशियाच्या मदतीने तयार केलेले आहे. 1975 मध्ये जर्मनीमधील एका कंपनीच्या मदतीने हे काम सुरु झाले होते. मात्र 1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती दरम्यान हे काम थांबवण्यात आले होते. त्यानंतर 1995 मध्ये इराण आणि रशियन मिलिटरी फॉर अॅटोमीक अॅनर्जी यांच्यात झालेल्या करारानुसार हे काम पुढे चालू झाले होते. तेव्हा रशियाची अॅटम्सट्रॉय एक्स्पोर्ट ला हे कंत्राट मिळाले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, बुशेह अणु संयंत्राची छायाचित्र आणि इराकची ताजा स्थिती