आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त ऑईलच नव्हे तर मानवी अवयवांचीही तस्करी करून खूप पैसा कमावतेय ISIS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: इस्लामिक स्टेटचे दहशतवादी)
रक्का- इस्लामिक स्टेटचे (ISIS) दहशतवादी फक्त ऑईलची तस्करी करत नाहीत तर त्यांच्याकडे पैसा कमावण्याचे अनेक स्त्रोत आहेत. मानवी अवयवांची तस्करी करून ISIS चे दहशतवादी मोठा पैसा कमावत आहेत.
इंग्रजी वेबसाइट 'अल मॉनिटर'च्या अहवालानुसार की रिपोर्ट के मुताबिक, इराकमधील ISIS चे दहशतवादी मृत व्यक्तींच्या अवयवांची विक्री करून मोठे उत्पन्न कमावत आहेत. या उत्पन्नाच्या जोरावरच ISIS इराक आणि सीरियासह अन्य देशांसोबत दोन हात करत आहे. दरम्यान, ISIS कडे इतका शस्त्रसाठा आहे की, ते सलक दोन वर्षे युद्ध करु शकतात, असे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्पष्ट झाले आहे.

ISIS एका वर्षात सुमारे दोन बिलियन डॉलर्स (1240 कोटी रुपयांपेक्षा जास्त) कमवले आहे. ISIS ही जगातील सगळ्यात मोठी दहशतवादी संघटना आहे. 'फोर्ब्स'च्या अहवालानुसार, ISIS चे एका दिवसाचे उत्पन्न 3 मिलियन डॉलर्स (जवळपास 19 कोटी रुपये) आहे.

इराक आणि सीरियामधील दहशतवादी संघटनाचे मुख्य स्त्रोत ऑईल आहे. दुसरीकडे, इराकमधून धक्कादायक माहिती मिळाली आहे. ती म्हणजे, इस्लामिक स्टेटने आता मानवी अवयवांची तस्करी सुरु केली आहे. 'अल मॉनिटर'नुसार, इस्लामिक स्टेट सौदी अरबमधील सर्जन व डॉक्टरांच्या मदतीने मोसुलमध्या मानवी अवयवांची खुलेआम तस्करी केली जात आहे. ISIS मानव अवयवांची तस्करी करण्यासाठी विशेषज्ज्ञ नेटवर्क'चा वापर करत असल्याचे, मोसुल येथील सूत्रांनी सांगितले आहे.

मोसुलमधील इराकी डॉ.सिरुवन अल मोसुली यांनी 'अल मॉनिटर'ला सांगितले की, मृत तसेच जिवंत व्यक्तीवर रुग्णालयात सर्जरी केली जाते. नंतर त्यांचे अवयव नेटवर्कच्या माध्यमातून इतरत्र पाठवले जातात. यासाठी इस्लामिक स्टेटने अनेक देश तसेच अरबी सर्जनसोबत करार केला आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून, इराकमधील ताज्या घडामोडी...