आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Releases New Training Camp Video Blood Of Jihad

पोटात लाथ मारून सुरू होते ISIS ची निवडचाचणी, पाहा ट्रेन‍िंग कँपचा VIDEO

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : आयएसआयएसच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षण देणारे तरुण.

बगदाद - आयएसआयएसमध्ये सहभागी होणा-यांना कशाप्रकारे प्रशिक्षण दिले जाते त्याचा एक नवा व्हिडिओ ISIS ने जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये सुमारे 100 दहशतवद्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. ट्रेनिंगदरम्यान नव्या सदस्यांना पोटात लाथ घालून त्यांच्या शक्तीची परीक्षा घेतली जाते. तसेच कोपरावर चालणे आणि शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देतानाही या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.
कठोर प्रशिक्षण
'द ब्लड ऑफ जिहाद इन निन्वेह' नावाचा बा सहा मिनिटांचा व्हिडिओ उत्तर इराकमध्ये शूट करण्यात आला आहे. त्यात डोळ्यावर पट्टी बांधलेला एक तरुण कोपरावर चालताना दाखवण्यात आल आहेत. प्रशिक्षण देणारा त्याच्या आजुबाजुल गोळ्या झाडत असल्याचेही यात दिसत आहे. व्हिडिओमध्ये एका ठिकाणी अनेक दहशतवादी बसलेले असून प्रशिक्षण देणारा त्यांच्या पोटावर गुडघ्याने मारत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये ट्रेनरच्या हातात एके-47, आरपीजी आणि पीके मशीन गन्स दिसत आहेत.
500 जेहादी इराक, सिरियाला पोहोचले
'द टेलिग्राफ' च्या रिपोर्टनुसार सुमारे 500 हून अधिक ब्रिटीश जेहादी सिरिया आणि इराकला पोहोचले आहेत. ते या प्रशिक्षण शिबारांत सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे या महिन्याच्या सुरुवातीलाच ISIS ने किर्कक च्या एका ट्रेनिंग कँपचा फोटो समोर आणला होता. जुलैतही निन्वेह प्रांतातील एका ट्रेनिंग कँपचे फोटो जारी करण्यात आले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ट्रेनिंग कँपचे फोटो आणि 'ब्लड ऑफ जिहाद'चे व्हिडिओ