बगदाद - ISIS (आता इस्लामिक स्टेट)च्या सुन्नी दहशतवाद्यांनी
इराकमध्ये एक 'स्लेव्ह मार्केट' अर्थात गुलामांचा बाजार मांडला आहे. येथे यजीदी आणि ख्रिश्चन समुदायाच्या बंदिवान महिला आणि बालकांची विक्री केली जात आहे. संयुक्त राष्ट्राच्या (यूएन) तपासकर्त्यांनी हा दावा केला आहे. यूएनच्या अहवालांनुसार इस्लामिक स्टेटने अडीच हजार महिला आणि मुलांना बंधक बनविले आहे. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होत आहे, त्यासोबतच दहशतवादी त्यांची विक्री 10 डॉलरमध्ये (साधारण 615 रुपये) करत आहे.
एका इंग्रजी वेबसाइटवर प्रकाशित वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्राने दावा केला आहे, की इस्लामिक स्टेटने येथे गुलामांचा बाजार थाटला आहे. संघटनेते नवीन तरुणांची भरती करण्यासाठी त्यांना प्रलोभन देण्यासाठी हे केले जात आहे.
इराकमधील हा बाजार मोसुलला लागून असलेल्या अल-कुदस आणि सीरियाच्या रक्का येथे सूरु करण्यात आला आहे.
ऑगस्टमध्ये दहशतवाद्यांच्या तावडीत सापडलेल्या एका महिलेने यूएनला फोन करुन तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाची माहिती दिली होती. एका यजीदी महिलेला दहा दहशतवाद्यांच्या हवाली करण्यात आले होते.
सबीहा (बदललेल नाव)ने यूरो न्यूज या वेबसाइटला दिलेल्या माहितीनुसार, 'आमची 10 ते 12 डॉलरमध्ये विक्री करण्यात आली. त्यानंतर आमच्यावर पशुपेक्षाही भयंकर अत्याचार केले गेले. देव कोणासोबत असे करेल का? सुन्नी दहशतवादी माणसे नाहीत तर, जनावरे आहे. एका महिलेवर सामूहिक बलात्कार होत होता, ते जनावरांसारखे तिच्यासोबत वागत होते.'
17 वर्षांची सबीहा दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाली. ती म्हणाली, मला मोसूल येथे यजीदी समुदायाच्या 40 महिलांसोबत बंदिवान बनविण्यात आले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आयएसआयएसचे स्लेव्ह मार्केट आणि त्याचा ट्विटरवर होत असलेला विरोध
(छायाचित्र - गुलामांना बेड्या टाकून बाजारात आणले जाते. ट्विटरवरुन घेतलेले छायाचित्र)