आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS च्या दहशतवाद्यांनी मांडलेल्या गुलाम महिलांच्या बाजाराचा VIDEO झाला व्हायरल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो
न्यूयॉर्क - दहशतवादी संघटना ISIS च्या ताब्यात असलेल्या सिरिया आणि इराकची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत आहे. दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्या महिलांवर अन्याय केले जात असल्याच्या बातम्या समोर येत असून त्यांचा बाजार मांडल्याचा पुरावाही एका व्हिडिओच्या रुपाने समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये एक दहशतवादी पिस्तुल खरेदी करण्यासाठी मोबदल्यात एका गुलाम महिला देण्याची चर्चा करत असताना दिसत आहे. दहशतवाद्यांकडून होणा-या महिला अत्याचारांचा समोर आलेला हा पहिलाच व्हिडिओ असल्याचे मानले जात आहे. सोशल मिडियावरही हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. विशेष म्हणजे ISIS ची वाढती ताकद पाहता संयुक्त राष्ट्रानेही इशारा दिला आहे. इतर देशांतून इराक आणि सिरियामध्ये जावून ISIS मध्ये सहभागी होणा-यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत जागतिक दहशतवादाशी ज्या देशांचे नाव जोडले गेलेले नाही, अशा देशांचाही यात समावेश असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले होते. सुमारे 15 हजार दहशतवादी इतर देशांतून ISIS मध्ये सहभागी झाल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.

काय आहे VIDEO मध्ये
तज्ज्ञांच्या मते हा VIDEO मोसूलमध्ये शूट करण्यात आला आहे. यात कॅमेरामॅन आज गुलामांच्या बाजाराचा दिवस असल्याचे जाहीर करतो. त्यानंतर कोणत्या गुलामाची किंमत काय यावर सगळे चर्चा करताना दिसत आहे. एक दहशतवादी निळ्या डोळ्यांच्या मुलीसाठी अधिक रक्कम मोजायला तयार असल्याची घोषणा करतो. तर दुसरा एक दहशतवादी हिरवे डोळे असणा-या 15 वर्ष वयाच्या मुलीची मागणी करताना दिसून येत आहे. एकाने तर एका पिस्तुलाच्या मोबदल्यात महिला देण्याची तयारी दाखवली आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, गुलामांच्या बाजाराचा VIDEO