आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Sexual Jihadi Twist Induction Via Sodomy! Blackmail Too

ISISच्या दहशतवाद्याचा खुलासा, 'माझ्या डोळ्यावर पट्टी बांधून 11 जणांनी केला गँगरेप'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - आयएसआयएसने (इस्लामिक स्टेट) मॅरेज ब्यूरोच्या नावाखाली तरुणांना जाळ्यात ओढले आणि संघटनेत भरती केल्याचे उघड झाले आहे. आयएसआयएसच्या एका दहशतवाद्याने कॅमेरासमोर निकाह म्हणजे रेप असल्याचे मान्य केले आहे. त्याने सांगितले, संघटनेत सहभागी होणार्‍या प्रत्येक जिहादीला यातून जावे लागते. अब्दूलने स्वतःचा अनुभव सांगताना म्हटले, त्याच्यावर 11 लोकांनी गँगरेप केला होता. तो म्हणाला, 'माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली आणि माझ्यावर अनेकांनी अत्याचार केले. 14 दिवसांनंतर ते परत आले आणि मला संघटनेत सहभागी होण्यास सांगितले. मी त्याला नकार दिला तर त्यांनी मला व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल केले. मी संघटनेत सहभागी झालो नाही तर, माझ्या कुटुंबियांना तो व्हिडिओ दाखवण्याची धमकी दिली.'
आयएसआयएस कमांडर संघटनेत नव्याने भरती होणार्‍या तरुणांवर गँगरेप करतात आणि त्याचा व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करतात. कमांडर त्यांना सांगतात की, निकाह (रेप) हलाल (कायदेशीर) आहे. अब्दुल करीम इब्राहिम याने सात लोकांचे शिर कलम केले आहे. इराक लष्कराच्या ताब्यात आल्यानंतर त्याने इस्लामिक स्टेटचे अनेक भयावह गुपिते उघड केली.
अॅम्सटर्डम येथील कुर्द वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, 'अब्दुलने निकाह म्हणजे रेप असल्याचे कॅमेरासमोर कबुल केले आहे.' फिरात वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार 20 वर्षीय फरहान सलीम उनुफ सफेन याच्यावर सहा लोकांनी बलात्कार केला होता. कॅमेरासमोर हे मान्य करण्यास त्याला लाजीरवाणे वाटत होते. तो म्हणाले, मी बेशुद्ध झालो होतो. जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा मला सांगण्यात आले, की मी आयएसआयएसमध्ये सहभागी झालो आहे.
याशिवाय अहमद हुसैन याने देखील कॅमेरासमोर मान्य केले आहे, की संघटनेत नव्याने भरती होणार्‍या युवकांना आमंली पदार्थ देऊन त्यांच्यावर गँगरेप केला जातो. या अत्याचाराला सामोरा गेलाला हुसैन सांगितो की, त्याच्यावर 15 वेळा गँगरेप करण्यात आला. त्यानंतर माला सांगितले, की कोणाही निकाह केल्याशिवाय संघटनेत सहभागी होऊ शकत नाही. इराक, सीरिया आणि मीडिल इस्ट मध्ये दहशत पसरवणार्‍या इस्लामिक स्टेटने जुलैमध्ये सीरियातील अल-बाब शहरात मॅरेज ब्यूरो सुरु केल्याची चर्चा आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, छायाचित्र आणि शेवटच्या स्लाइडवर व्हिडिओ