आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हाइट हाऊसमध्ये ओबामांचा शिरच्छेद करून अमेरिकेला मुस्लिम राष्ट्र करू - ISIS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचा व्हाइट हाऊसमध्ये घुसून शिरच्छेद करू, अशी धमकी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेने दिली आहे. यू ट्यूबवर हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली.

इसिसने एका कुर्दिश सैनिकाचा शिरच्छेद करतानाचा एक व्हिडिओ नुकताच प्रसिद्ध केला आहे. यात चेहरा झाकलेले तीन दहशतवादी उभे असल्याचे दिसत असून त्यांच्यासमोर एक कुर्दिश जवान गुडघ्यावर बसलेला आहे. या व्हिडीओत दिसणारे अतिरेकी व्हाइट हाऊसमध्ये घुसून ओबामा यांचा शिरच्छेद करू व ओबामांच्या शिरच्छेदानंतर अमेरिकेला मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित करू, अशी धमकी देत असल्याचे दिसते. या धमकीनंतर कुर्दिश सैनिकाचा शिरच्छेद करण्यात आल्याचा दावाही व्हिडीओमध्ये केल्याचे दिसते.

दुसऱ्या जपानीच्या हत्येची धमकी : इसिसच्या दहशतवाद्यांनी बुधवारी उशिरा जारी केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये ओलिस असलेल्या दुसऱ्या जपानी नागरिकाच्या हत्येची धमकी दिली. जपानच्या केंजी गोटो व हरूना याकुवा या दोघांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. यापैकी हरुना याकुवा याचा शिरच्छेद करण्यात येत असल्याचा व्हिडीओ या संघटनेने प्रसिद्ध केला होता. यात जपानने दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेकडे मागणी करण्यात आली होती.
यानंतर बुधवारी उशिरा जारी करण्यात आलेल्या ऑडिओत ओलिस ठेवलेल्या केंजी गोटो याचा आवाज प्रसिद्ध करण्यात आला आहे. खंडणीची मागणी पूर्ण केली नाही तर केंजी गोटोची हत्या व भयंकर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी यात देण्यात आली आहे.

दरम्यान, इसिसने जारी केलेल्या या ऑडिओ क्लिपची पडताळणी सुरू असून गोटो याची सुटका करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे जपान सरकारच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. यासाठी तुर्की, जॉर्डन व इस्रालयची मदत घेतली जाईल, असे हा प्रवक्ता म्हणाला.
एकाच कुटुंबातील चौघेही इसिसमध्ये
ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका कुटुंबातील चार मुले इसिसमध्ये दाखल झाले आहेत. बसिमा एल. बाफ यांची ही तरुण चार तरुण मुले ऑस्ट्रेलिया सोडून सिरियामध्ये लढण्यासाठी गेली आहेत. थायलंडला जात असल्याचे सांगून घर सोडलेले हे चौघे आता सिरियात दाखल झाले आहेत. ऑस्ट्रेलियामधून अनेक तरुण इसिससाठी सिरियात लढण्यासाठी गेले आहेत. यातील बहुसंख्य तरुण दुसऱ्या देशांतून ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झालेल्या पालकांची मुले आहेत.

उपाय फोल
तरुणांना इसिसमध्ये दाखल होण्यापासून रोखण्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकार कठोर उपाय करत आहे. देशातील संशयितांची पारपत्र रद्द करण्यात येत असून संशयित घरांवर छापे टाकले जात आहेत. मात्र, या उपायांचा फारसा फायदा होत नसल्याचेच चित्र आहे. आकर्षिल्या जाणाऱ्या तरुणांच्या संख्येत वाढ होत असल्याने ऑस्ट्रेलिया व पाश्चिमात्य देशांमध्ये सध्या तणावाची स्थिती आहे.

पाक-अफगाणिस्तानात कारवायांचे लक्ष्य
सध्या प्रचंड अस्थिर असलेला अफगाणिस्तान व तशीच परिस्थिती असलेल्या पाकिस्तानात आपला प्रभाव वाढवण्यासाठी इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने प्रयत्न सुरू केले आहेत. पाकिस्तानी तालिबान संघटनेच्या कमांडरला या भागात इसिसचा म्होरक्या म्हणून नेमण्याची घोषणा इसिसने केली असून संघटनेचा प्रवक्ता अबू महंमद अल-अदनानी याने ही माहिती दिली आहे. दरम्यान, इसिसच्या तथाकथित खिलाफतचे कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी खुरासान (अफगाणिस्तान) प्रांताचा वाली म्हणून पाकिस्तानातील तेहरिक-ए-तालिबान संघटनेचा नेता हाफिज सईद खान याची नेमणूक केली.

करण्यात आली आहे. भारतीय उपखंडामध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी कायदा या दहशतवादी संघटनेच्या योजनेनंतर चारच महिन्यांच्या आत इसिसनेही अशीच घोषणा केली. यासाठी अफगाण व पाकमधील विविध संघटनांचा वापर करून घेण्याचा इसिसचा प्रयत्न आहे.