बेरूत - सुन्नी दहशतवादी संघटना आयएसआयएसने इराकमधील प्रांतांवर ताबा मिळवल्यानंतर त्यास इस्लामिक स्टेट म्हणून घोषित केले आहे. याचे सीरियातील दहशतवाद्यांनी स्वागत केले आहे. इराक व सीरिया ही दोन वेगळी इस्लामी राष्ट्रे आहेत. अबू-अल-बगदादीला खलिफा घोषित केल्यानंतर दहशतवाद्यांनी रक्कामध्ये परेड कवायती केल्या. याची छायाचित्रे इस्लामिक स्टेट इन इराक अँड अल-शामने रविवारी ऑनलाइन पोस्ट केली आहेत. त्यात शस्त्रास्त्रांनी सज्ज दहशतवादी काळे झेंडे घेऊन कार्समध्ये फिरताना दिसतात. परेडमध्ये स्कड मिसाईल, रणगाडे, घोडदळ, रॉकेट लॉन्चर्स आणि आधुनिक मशीनगन्स दिसली. स्कड मिसाइल हे जुने झाले असून फक्त भीती निर्माण करण्यासाठी त्यांचा परेडमध्ये दहशतवाद्यांनी समावेश केलेला आहे, असे संरक्षण तज्ज्ञांनी सांगितले आहे. भूमध्य समुद्रापासून खाडीतील देशांच्या सीमेपर्यंत खिलाफत साम्राज्य कायम करण्याची इच्छा इस्लामिक स्टेटने व्यक्त केली आहे.
खलिफ घोषित करणे इस्लामसाठी इशारा
इस्लामी स्टेट घोषित करणे हे शेजारील सुन्नी राष्ट्रांसाठी धोकादायक आहे, असे इराकने सांगितले आहे. आयएसआयएसला सौदी अरबकडून मदत मिळत आहे,असा आरोप इराकी सेनेचे प्रवक्ते कारिम अट्टा यांनी केला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा आयएसआयएस दहशतवाद्यांच्या परेडाची छायाचित्रे....