आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS मध्ये सहभागी झालेल्या मजीदचे सत्य, खास कामगिरीसाठी परतला भारतात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चार मित्रांबरोबर पळून जाऊन ISIS या दहशतवादी संघटनेत सहभागी झालेल्या आरीफ मजीदचे सत्य हळू हळू समोर येत आहे. तपास अधिका-यांना आरीफने दिलेल्या माहितीवरुन अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की, त्याचे भारतात परत येणे हा एका सुनियोजित कारस्थानाचा भाग आहे. तो लग्न करण्याच्या आणि ISIS मध्ये सहभागी होण्याच्या इराद्याने परत आला असल्याचे चौकशीत समोर आले आहे. प्राथमिक चौकशीत आरीफने असे सांगितले होते की, त्याला गोळी लागली होती आणि योग्य उपचार मिळाला नसल्याने त्याला भारतात परतावे लागले.
त्याचबरोबर आरीफने असे सांगितले की, त्याच्याकडून ज्याप्रकारचे काम करून घेतले जात होते, त्याने तो समाधानी नव्हता. पण चौकशीत मात्र त्याच्या परतण्याचा उद्देश वेगळाच असल्याचे लक्षात येत आहे. एका खास उद्देशाने भारतात परतला असल्याचे तो मान्य करत आहे. आरीफने सांगितले की, 28 नोव्हेंबरला त्याला चार जणांनी इस्तानबूल विमानतळाजवळ सोडले होते. त्याला 2 हजार डॉलरही दिले होते. त्यावेळी त्याने वडिलांना फोन करून परतत असल्याची माहिती दिली. आरीफच्या वडिलांना एनआयएला त्याच्या परतण्याची माहिती दिली. त्यानंतर त्याला इस्तानबूलहून भारतात परत आणण्यात आले आणि बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली.

सहा महिने युद्धात सहभागी
आरिफने सांगितले की, ISIS साठी तो सहा महिने युद्धात सहभागी झाला होता. मोसूल बंधा-यावर ताबा मिळवण्यासाठी ISIS ने जो हल्ला केला होता, त्यात तो सहभागी झाला होता. तसेच इराकमध्ये भैजी आणि तालअफर तेल शुद्धीकरण संयंत्रावर केलेल्या हल्ल्यातही तो सहभागी होता. आरीफने तपास संस्थांना दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, सारियाच्या लष्कराचे दोन माजी अधिकारी अबू अनास आणि अबू मरियम हेही ISIS मध्ये सहभागी आहेत.

पुढे तो म्हणाला की, ISIS मध्ये भारतीय वंशाचे चार ब्रिटीशही सहभागी झाले आहेत. पण भारतातून मात्र त्याच्या आणि कल्याणच्या तिघांशिवाय कोणीही सहभागी नव्हते. आरीफने ISIS ने बंदी बनवलेल्या 39 मजुरांबाबत माहिती देण्यासही नकार दिला आहे.

(फाइल फोटो-ISIS मध्ये सहभागी झालेला आरीफ मजीद)