आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ISIS Terrorist Edges Near Jordan, John Kerry Meets Maliki

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सद्दामला फाशी सुनावणा-या जजची आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी केली हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - सद्दाम हुसेनला फाशीची शिक्षा सुनावणा-या जजचे अपहरण करून आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी त्याला फाशी दिली आहे. इराकमधील तत्कालीन हुकूमशहा सद्दामचा एकेकाळचा नीकटवर्तीय असलेल्या इब्राहिम अल दौरीच्या फेसबूक अकाऊंटवरून हा दावा करण्यात आला आहे. तसेच जॉर्डनच्या एका एमपीनेही त्याच्या फेसबूक पेजवर अशा दावा केला आहे. सरकारने मात्र, याला दुजोरा दिलेला नसून असे काहीही झाले नसल्याचे म्हटले आहे.

इंटरनॅशनल बिझनेस टाइम्सने अल-दौरी याच्या फेसबूक अकाऊंटचा हवाला देत सद्दामला फाशीची शिक्षा सुनावणा-या रऊफ अब्दुल रहमान याचे अपहरण झाल्याचे वृत्त दिले आहे. दौरी हा 2003 मध्ये अमेरिकेने इराकवर हल्ला केला तोपर्यंत इराकच्या कमांड काउंसिलचे उपाध्यक्ष होते. इराकमधील बंदी असलेल्या बाथ पक्षाचा तो नेताही होता. तर जॉर्डनचे एमपी खलील अतीहच्या फेसबूक पेजनुसार रहमान यांचे अपहरण करून त्यांना फाशी दिल्याचे वृत्त न्‍यूयॉर्क पोस्‍ट आणि इतर काही संकेतस्थळांनी दिले आहे. रहमान हे बगदादमधून एका डान्सच्या वेशात पळ काढत होते, त्यावेळी त्यांना पकडल्याचा दावा अतीहने केला आहे.
बसमधील 69 लोकांची हत्या
सुन्नी दहशतवाद्यांनी आता बगदादकडे मोर्चा वळवला आहे. सोमवारी सकाळी बगदादच्या दक्षिणेला दहशतवाद्यांनी बसता ताफा रोखून त्यातील 69 प्रवाशांची हत्या केली. बाबील प्रांतातील हाशिमिया येथे झालेल्या चकमकीत एक पोलिस आणि नऊ शस्त्रधारी ठार झाले. दरम्यान, दहशतवाद्यांनी सीरियाच्या सीमेबरोबरच जॉर्डनच्या सीमेवरील चेकपोस्टवरही ताबा मिळवला आहे.

ओबामांचा इशारा, केरी बगदादमध्ये
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी इराकमधील दहशतवाद इतर भागांमध्ये पसरण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी सोमवारी बगदादला पोहोचले. अमेरिकाने अरब देशांना इराकवर नव्या सरकारच्या स्थापनेसाठी दबाव टाकावा असे आवाहन केले आहे. इराकमध्ये एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर नव्या सरकारची स्थापना होत आहे. यात सर्व वर्गातील लोकांचा समावेश असावा असे अमेरिकेने म्हटले आहे.
फोटो : आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी अमेरिकानिर्मित सैन्‍यवाहन हम्‍वीजवर ताबा मिळवला.

पुढे पाहा - इराकमध्ये सुरू असलेल्या घटनाक्रमाची छायाचित्रे